माझा नव्हे, सुरगाण्यात आमदार नितीन पवारांचा करेक्ट कार्यक्रम झाला!

आमदार नितीन पवार यांच्या टिकेला दिले सडेतोड उत्तर.
Centre Minister Dr Bharti Pawar
Centre Minister Dr Bharti PawarSarkarnama

कळवण : नगरपंचायत निकालानंतर राष्ट्रवादीचे (NCP) आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांनी भाजप (BJP) नेत्या व केंद्रीय मंत्री डॅा. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांच्यावर टिका केली होती. याबाबत डॅा पवार म्हणाल्या, जनतेने आणचा नव्हे तर आमदार पवार यांचाच सुरगाण्यात करेक्ट कार्यक्रम केला, हे त्यांनी विसरू नये.

Centre Minister Dr Bharti Pawar
जितेंद्र आव्हाडांचा बॅाम्ब; नाशिक महापालिकेत ७०० कोटींचा घोळ!

त्या म्हणाल्या, आमच्या उमेदवारांवर अर्ज दाखल करण्यापासून परावृत्त करण्याचे अनेक प्रयोग झाले. दबाव, धमक्या मिळाल्या. असे असताना आमचा जनाधार वाढला आहे. आम्ही यापूर्वी देखील कळवणमध्ये सत्तेत नव्हतो, हे आरोप करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. ळवणमध्ये आमच्या उमेदवारांवर अनेक प्रकारे दबाव आणला गेला. धमक्या येत होत्या. या टेक्नीकवर मी राजकारण करत नाही. पहिल्यांदा भाजपने पंधरा जागांवर उमेदवार दिले. हे पहिल्यांदा झाले. एव्हढे दबावाचे व धमक्यांचे प्रकार होऊनही आमचे उमेदवार निवडून आले व मिळालेले मतदान वाढले आहे. आम्ही आमचे काम यापुढेही करीत राहू. कोणावरही आमची नाराजी नाही. भारती पवार काय आहेत, हे माझ्या विरोधकांनाही माहिती आहे. मी कुठल्याही धमक्यांना घाबरणारी नाही. कोणी माझा करेक्ट कार्यक्रम केला असा दावा करीत असेल तर, सुरगाण्यात कोणाचा करेक्ट कार्यक्रम झाला, याचे उत्तर त्यांनी द्यावे.

Centre Minister Dr Bharti Pawar
निफाडला राष्ट्रवादीचे तीघे जिंकले, त्यातही दोन शिवसेनेच!

केंद्रीय राज्यमंत्री पवार म्हणाल्या, सध्या ज्या बातम्या आमचे राजकीय विरोधक देत आहेत, त्याची मी दखल देखील घेणार नव्हते. ज्या प्रकारे राष्ट्रवादीचे आमदार बेफाम आरोप करीत आहे, त्यता त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, कळवणमध्ये आम्ही काही सत्तेत नव्हतो. आमचे दहा सदस्य होते आणि आता त्याचे दोन झाले तर ठिक असते. तीथे भाजपची सुरवात होत आहे. जनाधार वाढतो आहे. विशेषतः माझा विश्वास जनसेवा आणि ज्या जनतेचे प्रतिनिधीत्व करतो, त्यांच्यासाठी कार्यरत राहणे आहे. त्यात मी कुठेही व कधीही कमी पडणार नाही हा माझा विश्वास आहे. एक निवडणूक जिंकल्याने कोणी लगेच हुरळून जावे अशी स्थिती नाही. आजही नगरपंचायतीत केंद्र शासनाच्या योजनांची दहा कोटींची कामे शहरात सुरु आहे. लोकांनी माझ्याकडे कधीही, कशाचीही तक्रार केलेली नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्यावरच माझा भर राहिला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, माझ्या गटाची किंवा पक्षाची कळवण नगरपंचायतीत सत्ता किंवा बहुमत नव्हते. त्यामुळे जर आमचे विरोधकांना जास्त जागा मिळाल्या असतील तर ते नैसर्गिक आहे. मात्र या निवडणूकीत व्यक्तीगत माझ्यावर कोणी राजकीय प्रश्न उपस्थित करीत असतील तर मग सुरगाण्याच्या निकालाबाबत त्यांच्याकडे काय उत्तर आहे?. सुरगाण्यात आमचे ८ सदस्य निवडून आले. आमचे तालुका अध्यक्ष रमेश थोरात हे अवघ्या ३ मतांनी पराभूत झाले. राष्ट्रवादीचा जो एकमेव सदस्य विजयी झाला तो आधी कोणत्या पक्षात होता, याचा उत्तर ते देणार का?. त्यामुळे आम्ही जवळपास बहुमतापर्यंत पोहोचलो आहेत. सुरगाण्यात भाजपला चांगले यश मिळाले आहे. तो देखील कळवण विधानसभा मतदारसंघाचाच भाग आहे. त्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडे काय उत्तर आहे, असा प्रश्न त्यांनी केला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com