नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackerey) शिवसेनेचे (Shivsena) नाशिक (Nashik) जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Choudhary) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. श्री. चौधरी हे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे विश्वासू सहकारी असल्याने अनेकांना धक्का बसला आहे. (Bhausaheb choudhary was connected with Shinde group)
राज्यभर बंडखोरी होऊनही नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात शिवसेना अभेद्य ठेवली होती. मात्र एव्हढे परिश्रम घेऊनही गेल्या आठवड्यात तेरा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. या सर्व घडामोडीत जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी कुठेही चर्चेत नव्हते. आता मात्र त्या प्रवेशामागे चौधरी यांनीच सुत्र हलवल्याचे पुढे आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. तसा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.
भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे नाशिक जिल्ह्याची जबाबदारी होती. खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेल्या चौधरी यांना चांदवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूकदेखील लढवायची होती. नाशिक शहर तसेच ग्रामीण भागात त्या दृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने ते नाशिक जिल्ह्यात संपर्कात होते. डोंबिवलीत राहत असले तरी नाशिकमधून निवडणूक लढविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
खासदार राऊत यांचे निकटवर्ती मानले जात असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संपर्कात ते अधिक होते. ते काल सायंकाळी नागपूरला दाखल झाले. याची कुणकुण लागताच सायंकाळी त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हाकालपट्टी करण्यात आली. तसे पत्र खासदार संजय राऊत यांनी समाज माध्यमांवर अपलोड केले.
शिवसेनेच्या कोर कमिटीत महत्त्वाचे स्थान असलेल्या भाऊसाहेब चौधरी यांचा बुधवारी रात्री झालेला शिंदे गटातील प्रवेश अनेकांना धक्कादायक ठरला. त्यापूर्वीच शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. चौधरी संघटना बळकटीसाठी शिवसेनेच्या विधानसभा अध्यक्ष, गटप्रमुख शाखाप्रमुखांच्या बैठका घेण्याचे नियोजन करत होते. यात त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. ज्या वेळी सत्ता व पक्षाला सुगीचे दिवस होते, त्या वेळी तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटले नाही. मात्र, आता संघटनेच्या निष्ठेचे धडे देऊ लागले, असे उघडपणे त्यांना बोलले जात होते.
षडयंत्रमागे चौधरी?
मागील आठवड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत १३ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. या १३ नगरसेवकांच्या फुटीमागे चौधरी यांचे नियोजन असल्याचे बोलले जात आहे. याबाबत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले, भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे शिवसेना संघटना बळकट करण्याची जबाबदारी होती. परंतु, त्यांनी विश्वासघात केला. तेरा माजी नगरसेवकांना फोडण्यात त्यांचाच हात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.