Sujay Vikhe On Bhausaheb Wakchaure : भाऊसाहेब वाकचौरे ‘यूबीटी’त राहणार की 'NDA'त जाणार? सुजय विखेंकडून ‘स्वागता’चे संकेत

Bhausaheb Wakchaure absence from key Shiv Sena UBT meeting sparks fresh speculation over possible return NDA camp : शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची शिर्डी मेळाव्याला दांडीनंतर पक्षांतर्गत संशयाला उधाण येताच, भाजपचे सुजय विखे पाटलांनी सूचक ऑफर देत खळबळ उडवून दिली आहे.
Sujay Vikhe On Bhausaheb Wakchaure
Sujay Vikhe On Bhausaheb WakchaureSarkarnama
Published on
Updated on

NDA politics Maharashtra : शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षात कायम राहणार की पुन्हा एकदा भाजपप्रणित NDAच्या दिशेने वाटचाल करणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. शिर्डी येथे आयोजित शिवसेना ठाकरे सेनेच्या महत्त्वाच्या मेळाव्याला त्यांनी अनुपस्थिती दर्शवल्यानंतर पक्षातीलच काही नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे.

त्यातच छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी, वाकचौरे आमच्यातून गेलेतच जमा आहेत, असे वक्तव्य करत चर्चेला नवे परिमाण दिले आहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी, ते आमच्यात आले तर त्यांचे स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया देत राजकीय तर्कवितर्कांना अधिक हवा दिली.

भाऊसाहेब वाकचौरे यांचा राजकीय प्रवास नेहमीच चर्चेत राहिला आहे. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना चंद्रकांत खैरे यांनी त्यांची ओळख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी करून दिली होती. त्यानंतर शिवसेनेच्या तिकिटावर ते शिर्डीतून (Shirdi) खासदार झाले आणि 'NDA'चा भाग म्हणून दिल्लीत पोहोचले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील दिवंगत लोकनेते बाळासाहेब विखे पाटील तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) यांच्याशी वाकचौरे यांचे दीर्घकाळापासून घनिष्ठ संबंध राहिले आहेत. खासदार असतानाही त्यांनी काँग्रेसमध्ये असलेल्या बाळासाहेब विखे पाटील यांच्यासोबत दुष्काळग्रस्त भागांचे दौरे करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. पुढे त्यांच्या आग्रहावरून वाकचौरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळवली. मात्र 2014 मधील मोदी लाटेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Sujay Vikhe On Bhausaheb Wakchaure
Vivek Kolhe Vs Radhakrishna Vikhe Patil: ‘घायल होता हूं, तब घातक होता हूं’; विवेक कोल्हेंचा विखेंना थेट इशारा? अमित शाह-फडणवीस ‘हॉटलाइन’चाही दावा

यानंतर विखे परिवार भाजपमध्ये गेल्यानंतर वाकचौरेही पुन्हा भाजपच्या जवळ आले. दरम्यान, बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये शिवसेनेने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि ते खासदार म्हणून निवडून आले. मात्र सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Sujay Vikhe On Bhausaheb Wakchaure
Operation Tiger Returns? : 'ऑपरेशन टायगर'चं मला काहीच माहिती नाही; शिंदे भेटीवर ठाकरेंच्या शिलेदाराचं ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, वाढवलं राजकीय टेन्शन

गेल्या काही महिन्यांत वाकचौरे यांची भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील नेत्यांशी वाढलेली जवळीकही चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबई आणि दिल्लीतील बैठका, विविध कार्यक्रमांमधील उपस्थिती तसेच भाजप नेत्यांसोबतचे वाढते संपर्क याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. वर्षभरापूर्वी भाजपच्या एका कार्यक्रमात ते थेट राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शेजारी बसल्यानेही चर्चांना उधाण आले होते.

दरम्यान, शिवसेना ठाकरे सेनेच्या शिर्डी मेळाव्याला त्यांची गैरहजेरी पक्षातील अनेकांना खटकली. त्यावर चंद्रकांत खैरे यांनी "ते आमच्यात राहणार नाहीत, असे स्पष्ट मत व्यक्त केले. मात्र वाकचौरे यांनी हा आरोप फेटाळत, मी संसदीय समितीच्या दौऱ्यावर पंजाबमध्ये होतो, असा खुलासा केला आहे.

तरीही संशय कायम असतानाच डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाऊसाहेब वाकचौरे आमच्यात आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे विधान केले. त्यामुळे शिर्डीच्या राजकारणात आणि शिवसेना ठाकरे सेनेत नव्या राजकीय घडामोडींची चर्चा अधिकच रंगली आहे. आता वाकचौरे स्वतः पुढील राजकीय दिशा स्पष्ट करतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com