Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर भुजबळांचे कार्यकर्त्यांना थेट निवडणुकीच्या तयारीचे आदेश

Nashik NCP News : अहमदनगर येथे होणार राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal in Nashik : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० जून रोजी वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त पक्षाचा अहमदनगर येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे आढावा बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मेळाव्याला नाशिकमधून जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यासह आगामी निवडणुकांबाबत त्यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले, "पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाशिक जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. सध्या जिल्ह्यात पक्षाचे सहा आमदार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातून १० आमदार निवडून देऊन त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी आता होणाऱ्या नगरच्या मेळाव्यात सर्वाधिक पदाधिकारी व कार्यकर्ते नाशिक जिल्ह्यातील असायला हवेत. महिला पदाधिकाऱ्यांचाही या मेळाव्यात सहभाग असावा."

Chhagan Bhujbal
Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; राष्ट्रवादीची मागणी

यावेळी भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना निवडुकांबाबत तयार राहण्याचे आवाहन केले आहे. भुजबळ म्हणाले, "आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही होण्याची शक्यता आहे. त्यानंतर होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी (Election) आपल्या सर्वांना तयार असायला हवे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. त्यासाठी पक्षाच्या प्रत्येक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वाढीसाठी अधिक योगदान द्यावे. देशात महापुरुषांची बदनामी करण्यात येत आहे. या विरोधात आपण जागरूक राहून लढा दिला पाहिजे."

Chhagan Bhujbal
Sanjay Raut News : नाशिकमध्ये संजय राऊतांची गाडी अडवण्याचा प्रयत्न; ठाकरे अन् शिंदे गट भिडले

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज आहिरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी आमदार संजय चव्हाण, माजी आमदार शिवराम झोले, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे आदी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com