Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; राष्ट्रवादीची मागणी

NCP News: भाजप नेते शास्त्रीजींचा आदर्श घेतील का? रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतील का?
Odisha Train Accident
Odisha Train Accident Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : ओडिशा राज्याच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या तीन रेल्वेगाड्यांच्या अपघातात 250 पेक्षा जास्त प्रवाशांचा बळी गेला असून जवळपास एक हजार जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने आज केली आहे.

दोन प्रवासी आणि एक मालगाडीच्या भीषण धडकेत मरण पावलेल्यांना पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज श्रद्धांजली वाहण्यात आली. मृत प्रवाशांच्या परिवाराच्या दुःखात आपण सामील असल्याचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले. रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे.

Odisha Train Accident
Thorat VS Vikhe Patil: 'निळवंडे'चे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न; थोरातांनी विखे पाटलांना सुनावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या सुरक्षा कवच योजनेवर या अपघाताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे ते म्हणाले. भाजपने जाहिरातबाजी कमी करून देशभरात होणाऱ्या रेल्वे तसेच रस्ते अपघातांबाबत चिंतन करण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला.

केंद्र सरकार फक्त लक्झरी गाड्यांवर लक्ष केंद्रित करत असून सर्वसामान्यांच्या गाड्या आणि ट्रॅक दुर्लक्षित आहेत. ओडिशातील हा अपघात आणि त्यातील मृत्यू हा त्याचाच परिणाम आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जीविताची किंमत कोण ठेवणार? असा संतप्त सवालही गव्हाणे यांनी केला.

Odisha Train Accident
Omraje Nimbalkar On his Fathers memorial day : आमदार, खासदार झालो तरी राजेसाहेब, तुमचा मुलगा हीच माझी खरी ओळख..

भाजप नेते शास्त्रीजींचा आदर्श घेतील काय?

ओडिशा येथील भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करतानाच गव्हाणे यांनी स्वर्गीय माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या छोट्याशा अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून ताबडतोब पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता, या घटनेची आठवण करून दिली. भाजप नेत्यांमध्ये तेवढी नैतिकता आणि संवेदनशीलता आहे काय? असा सवालही त्यांनी केला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com