Bhujbal Warning to BJP : भुजबळांनी टोचले भाजपचे कान; विधानसभा निवडणुकीतील संभाव्य धोकाही सांगितला!

Assembly Election 2024 : भुजबळ यांनी आणखी एक धोका महायुतीच्या नजरेस आणून दिला आहे. मनुस्मृतीचे दोन श्लोक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाणार आहेत. त्याचे काय पडसाद उमटतील, याचा विचार केलेला दिसत नाही. यातून समाजासाठी आणि विरोधकांसाठी महायुतीच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक नवा विषय आयताच उपलब्ध झाला आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik, 30 May : भारतीय जनता पक्षाच्या ‘चारसो पार’ या घोषणेवरील कवित्व अद्याप संपलेले नाही. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्याचा पुन्हा एकदा पुनरुचार केला आहे. असे करताना त्यांनी भारतीय जनता पक्षाचे कानही टोचले आहेत.

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारात ‘आब की बार, चारसो पार’ ही घोषणा भाजपच्या अंगलट आली आहे. भाजपला (BJP) या घोषणेवरून मतदारांची समजूत घालण्यासाठी विविध प्रकार करावे लागले आहेत.

या घोषणेवरून भारतीय जनता पक्षाने प्रचारात लाभ उठविणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्याचा उलटा परिणाम झालेला आहे. या घोषणेचा विरोधकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे चित्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal
Adam's Sensational Allegations : माजी आमदार आडम मास्तरांचा काँग्रेसवर खळबळजनक आरोप; ‘माझ्याकडे लाखो रुपये घेऊन आले होते...’

या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजपचे कान टोचले आहेत. ‘अब की बार, चारसौ पार’ या घोषणेचा मतदारांमध्ये वेगळाच संदेश गेला. विरोधी पक्षाने ज्या वेगाने त्याचे भांडवल केले. ते रोखणे भाजपला जमले नाही. एवढ्या जागा कशासाठी हव्या आहेत?

हे मतदारांना पटवून देता आले नाही. त्यामुळे शेवटी शेवटी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांना याबाबत खुलासा करावा लागला. एका दूरचित्रवाहिनीवरील मुलाखतीत 20 ते 25 मिनिटे पंतप्रधान या एकाच मुद्द्यावर जनतेला खुलासा देत होते. यापासून भाजप काही बोध घेणार आहे की नाही? असा प्रश्न त्यांनी केला.

भुजबळ यांनी आणखी एक धोका महायुतीच्या नजरेस आणून दिला आहे. मनुस्मृतीचे दोन श्लोक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाणार आहेत. त्याचे काय पडसाद उमटतील, याचा विचार केलेला दिसत नाही. यातून समाजासाठी आणि विरोधकांसाठी महायुतीच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक नवा विषय आयताच उपलब्ध झाला आहे.

भुजबळ यांनी याबाबत आणखी एका गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्याने जी वैचारिकता रुजवू पाहत आहे. त्या यंत्रणेला देखील हा अप्रत्यक्ष इशारा मानला जातो. त्याचा फटका भारतीय जनता पक्षाशी युती केलेल्या राजकीय पक्षांना बसू शकेल. भुजबळ यांच्या सूचक इशाऱ्याला भाजप किती गांभीर्याने घेते, हा उत्सुकतेचा विषय आहे.

Edited By : Vijay Dudhale

Chhagan Bhujbal
Shahajibapu Patil : मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली शहाजीबापू पाटलांच्या तब्यतेची विचारपूस

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com