Adam's Sensational Allegations : माजी आमदार आडम मास्तरांचा काँग्रेसवर खळबळजनक आरोप; ‘माझ्याकडे लाखो रुपये घेऊन आले होते...’

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत माजी आमदार नरसय्या आडम यांनी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना सशर्त पाठिंबा जाहीर केला होता. सोलापूर शहर मध्य मतदारसंघ हा आगामी विधानसभा निवडणुकीत माकपला सोडावा, अशी मागणी केली होती. सीताराम येच्युरी आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यामध्ये तशी चर्चाही झाली हेाती. त्यावेळी हा मतदारसंघ माकपला सुटणार असल्याचा दावा आडम यांनी केला होता.
Narsayya Adam Master
Narsayya Adam MasterSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 30 May : इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी काँग्रेस पक्षावर खळबळजनक आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवाले माझ्याकडे लाखो रुपये घेऊन आले होते. पण, माकपच्या कार्यकर्त्यांनी एक रुपयाही न घेता प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचे काम केले आहे, असा दावा माजी आमदार आडम यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam Master) यांनी काँग्रेसच्या (Congress) उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना सशर्त पाठिंबा जाहीर केला होता. सोलापूर शहर मध्य मतदारसंघ हा आगामी विधानसभा निवडणुकीत माकपला सोडावा, अशी मागणी केली होती. सीताराम येच्युरी आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यामध्ये तशी चर्चाही झाली हेाती. त्यावेळी हा मतदारसंघ माकपला सुटणार असल्याचा दावा आडम यांनी केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narsayya Adam Master
Shahajibapu Patil : मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली शहाजीबापू पाटलांच्या तब्यतेची विचारपूस

सोलापुरातील सीटूच्या वर्धापन दिन कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी आमदार आडम यांनी आज वेगळीच भाषा वापरली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी टिकणार की नाही, याची उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र, आडम मास्तर यांच्या आजच्या भाषणावरून आघाडीबाबत ते फार आशावादी नसल्याचे दिसून आले.

माजी आमदार आडम म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसकडून एक रुपयाही न घेता प्रामाणिकपने काम केलं आहे. त्यावेळी काँग्रेसवाले माझ्याकडे लाखो रुपये घेऊन आले होते.

मात्र, लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आला नाही. कोणाचाही एक रुपया न घेता माकपच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमान दाखवत लाल झेंड्याला खऱ्या अर्थाने सलामी दिली आहे.

Narsayya Adam Master
Bhujbal ON Awhad: भुजबळांकडून आव्हाडांची पाठराखण; आव्हाड म्हणाले, 'त्यामुळेच मी आपले नाव घेतले...'

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे, त्यामुळे इंडिया आघाडी आपल्याला जागा सोडेल, या भ्रमात राहू नका. आत्तापासूनच त्यांचे कट चालू आहेत.

आपल्या ताकदीवर विधानसभेसाठी सोलापुरातून आपला झेंडा फडकावा लागणार आहे, असे सांगून माकपचे जेष्ठ नेते आणि सोलापूरचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आगामी विधानसभा स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले.

Edited By : Vijay Dudhale

Narsayya Adam Master
Jayant Patil News : जितेंद्र आव्हाडांसाठी जयंत पाटील सरसावले, 'त्यांनी 35 वर्ष...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com