`ओबीसी` आरक्षण मिळाल्याने येवल्यात कार्यकर्त्यांनी पेढे वाटले

येवला शहरात ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचे भुजबळ समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले.
OBC reservation celebration in Yeola
OBC reservation celebration in YeolaSarkarnama
Published on
Updated on

येवला : सुप्रीम कोर्टाने (Supreme court) ओबीसीचे (OBC) राजकीय आरक्षण पूर्ववत करताच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या येथील संपर्क कार्यालय समोर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशा वाजून,फटाके फोडून एकच जल्लोष साजरा केला. (People welcomes OBC reservation decision in Yeola)

OBC reservation celebration in Yeola
उद्धव ठाकरेंनी मिठी मारली, तुम्ही पाठीत खंजीर खुपसला!

येथील भुजबळ कार्यालयाबाहेर जमून कार्यकर्त्यांनी निर्णयाचे स्वागत करतानाच पालकमंत्री छगन भुजबळ यांचेही वारंवार लढा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ यांनी लढा उभा केला होता, त्याला यश आल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

OBC reservation celebration in Yeola
खासदार हेमंत गोडसे फुटले, मात्र शिवसैनिक जागचा हलला नाही.

राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले असून याचे संपूर्ण श्रेय हे छगन भुजबळाचे आहे. सर्व ओबीसी बांधवासाठी आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी भुजबळ यांनी सातत्याने प्रयत्न केले. शासन दरबारी तसेच न्यायालयीन सर्व जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून राज्यातील सर्व ओबीसी बांधवाना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील ओबीसी बांधवांतर्फे तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे भुजबळांचे विशेष आभार मानत असल्याची प्रतिक्रिया माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी समता परिषदेचे प्रचारक संतोष खैरनार, माजी शहराध्यक्ष राजेश भांडगे, साहेबराव मढवई, दीपक लोणारी, मोहन शेलार, लक्ष्मण कदम, गोटू मांजरे, सुभाष गांगुर्डे, दत्ता निकम, विक्की बिवाल, बाळासाहेब आवारे, मलिक शेख, राहुल इंगळे, शफिक शेख, अजित शेख, संतोष राऊळ, सचिन सोनवणे, नितीन आहेर, भाऊसाहेब धनवटे, योगेश खैरनार, पवन गादेकर, गणेश गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com