Bhusawal News: भुसावळ हादरलं;माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या

Jalgaon: गोळीबारामध्ये दोन युवकांचा मृत्यू झाला.माजी नगरसेवक संतोष बारसे (Santosh Barse) आणि सुनील राखुंडे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.
Bhusawal News
Bhusawal NewsSarkarnama

Jalgaon News, 30 May: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal Crime News) शहर गोळीबाराच्या घटनेने हादरुन गेले आहे. गोळीबारामध्ये दोन युवकांचा मृत्यू झाला.माजी नगरसेवक संतोष बारसे (Santosh Barse) आणि सुनील राखुंडे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

या घटनेने भुसावळमध्ये खळबळ उडाली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. जुन्या वादातून ही हत्त्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भुसावळ शहरातील न्यू सातारा रोडवरील मरीमाता मंदिर परिसरात ही घटना घडली.

Bhusawal News
Pune Hit And Run Case : 'बाळा'च्या रक्ताचे सॅम्पल बदलण्यासाठी बाहेरील व्यक्ती 'ससून'मध्ये?

काल (बुधवारी) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष राखुंडे हे दोघे कारमध्ये बसले होते तेव्हा अचानक या दोघाच्या दिशने अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या.

हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जुन्या वादातून ही हत्त्या झाल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन आणि त्यांचे सहकारी हल्लेखोरांच्या शोधात आहेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय महाविद्यालय पाठविण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com