Bhusawal Politics: अनिल चौधरी यांचा पलटवार, संजय सावकारे मंत्री झाल्यावर भुसावळ शहरात वाढली होती गुन्हेगारी!

Bhusawal Municipality Election Allegation Minister Sanjay Savkare was challenged by Anil Chaudhary of Prahar Sanghatana -प्रहार संघटनेचे नेते अनिल चौधरी यांनी मंत्री संजय सावकारे यांना नडले; भ्रष्टाचार प्रकरणी दिले थेट आव्हान!
Anil Choudhary & Sanjay Savkare
Anil Choudhary & Sanjay SavkareSarkarnama
Published on
Updated on

Choudhary vs Savkare News: भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची हवा चांगलीच तापली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर भाजप विरोधक अलर्ट झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला गती आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुसावळ येथे सभा झाली. या सभेत मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला मतदानाचे आवाहन त्यांनी केले. या सभेनंतर विरोधक चांगलेच अलर्ट झाले.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपवर टीका केली. त्या पाठोपाठ महाविकास आघाडीचे नेते आणि प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख अनिल चौधरी यांनीही सावकारे यांना थेट आव्हान दिले. निवडणूक जिंकण्यासाठी दबावाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

Anil Choudhary & Sanjay Savkare
Eknath Khadse Politics: नगरपालिका निवडणुकीत पुन्हा खडसे विरूद्ध फडणवीस अंक; नाथा भाऊंनी देवा भाऊंना स्पष्टच सुनावले, ‘नगरपालिकेच्या प्रचाराला कधी मुख्यमंत्री आल्याचे ऐकले नव्हते’

मंत्री सावकारे यांना हद्द वाढीतून येणाऱ्या निधीवर आपला अधिकार सांगायचा आहे. हद्द वाढीच्या निधीवर भ्रष्टाचाराचे इमले चढवायचे आहेत. त्यासाठी त्यांना नगरपालिकेची सत्ता आपल्याकडेच हवी आहे.

Anil Choudhary & Sanjay Savkare
Sachin Gujar FIR : अपहरण करून मारहाण केलेल्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या अडचणी वाढल्या; कारण आलं समोर...

नगरपालिकेच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट झाली आहे. ३१ कंत्राटदारांचा निधी अडवून त्यांना निवडणुकीत दबावाखाली आणले. त्यामुळे या निवडणुकीत जनता विकास आघाडीला मतदान करील असा दावा चौधरी यांनी केला.

आपल्याला त्रास देण्यासाठी यापूर्वी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यावेळी मात्र तसा प्रयत्न झाल्यास आम्ही विरोधकांना सोडणार नाही. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना चोख उत्तर दिले जाईल, असे चौधरी म्हणाले.

नगरपालिका निवडणुकीत यापुढे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गांचा वापर करू. यापुढे भुसावळ नगरपालिकेच्या कामकाजात सक्रिय राहून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार.

मंत्री सावकारे यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आम्ही कायदे तज्ञांची मदत घेणार आहोत. भ्रष्टाचार करणाऱ्यांना जेलमध्ये पाठविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. विशेषता मंत्री सावकारे यांनी केलेल्या भ्रष्टाचारांची कागदपत्रे मिळवून त्यांचे पितळ उघडे पाडू, असा इशारा प्रहारचे चौधरी यांनी दिला.

मंत्री आणि सत्ताधारी महायुती नगरपालिका निवडणुकीत गैरमार्ग आणि आर्थिक गैरप्रकार करीत आहे. आम्ही मात्र लोक वर्गणीतून नगराध्यक्ष पदाचा प्रामाणिक आणि विकास करणारा उमेदवार दिला आहे. भुसावळ ची जनता यावेळेस खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी राहील, असा दावा देखील चौधरी यांनी केला.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com