Sachin Gujar FIR : अपहरण करून मारहाण केलेल्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या अडचणी वाढल्या; कारण आलं समोर...

Congress Ahilyanagar President Sachin Gujar Booked for Alleged Insult to Iconic Personalities : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्याविरोधात श्रीरामपूर पोलिसांनी महापुरूषांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
Sachin Gujar FIR
Sachin Gujar FIRSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar political news : हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अपहरण करून जीवघेणा हल्ला केलेले काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

भाषणात महापुरूषांचा एकेरी उल्लेख केल्याने त्यांच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ऋषिकेश सरोदे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

ऋषिकेश सरोदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, समाज माध्यमांवर बुधवारी एक चित्रफित प्रसारित झाली आहे. ही चित्रफित पाहिल्यावर, सचिन गुजर यांनी नगरपरिषद निवडणुकीतील, प्रभाग दोनमधील प्रचारसभेत बोलताना महापुरूषांबद्दल एकेरी भाषेत अवमानकारक उल्लेख केल्याचे दिसून येते. यावरून श्रीरामपूर (Shrirampur) शहर पोलिसांकडे ऋषिकेश सरोदे यांनी तक्रार दिली. पोलिसांनी सचिन गुजर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. या मारहाणीत त्यांच्यावर तीनदा पिस्तूल रोखण्यात आलं. विवस्त्र करून त्यांना रस्त्यावर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली असून, तिघांना अटक केली आहे. यावेळी राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. राज्यभरात काँग्रेस आक्रमक झाली.

Sachin Gujar FIR
Model code of conduct violation : फडणवीसांच्या खासगी सचिवांकडून आचारसंहितेचा भंग; निवडणूक आयोगाची गंभीर दखल, जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचा आदेश

श्रीरामपूरमधील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं. हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगून चंदू आगे याने हल्ल्याची जबाबदारी घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने आपण हे कृत्य केल्याचा दावा, समाज माध्यमांवर व्हिडिओ शेअर करत चंदू आगे याने केला.

Sachin Gujar FIR
Maharashtra Politics: होऊ दे खर्च! फडणवीस, शिंदे, अजितदादांकडून प्रत्येक नगरपालिकेसाठी 10 कोटीचं बजेट?

दरम्यान, भाजप अन् हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी महापुरूषांचा एकेरी उल्लेख करत अवमान केल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या निषेध आंदोलनाला भाजपने आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आत्मक्लेश आंदोलन करत प्रत्युत्तर दिले. यावरून श्रीरामपूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापुरूषांचा एकेरी उल्लेख केल्याची चित्रफित पोलिसांकडे सादर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com