लेखापरिक्षकांना वादग्रस्त `वॉटरग्रेस`च्या बिलांची नस्तीच दिली नाही?

लेखापरिक्षणासाठी आलेल्या पथकाला नस्ती उपलब्ध झाल्या नसल्याचा आरोप आहे.
Garbage In Dhule city

Garbage In Dhule city

Sarkarnama

धुळे : कचरा संकलनाचे (Dhule) काम करणाऱ्या वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स या कंपनीच्या कामाबाबत राज्यभर चर्चा आहे. या कंपनीच्या कामात स्थानिक शिवसेना नगरसेवक (Shivsena)भागीदार असल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारी आल्याने औरंगाबाद येथून लेखा परिक्षणासाठी आलेल्या पथकाला या कंपनीच्या कामाच्या नस्ती व अन्य कागदपत्रच मिळाले नाही. ते कोणी गायब तर केले नाही ना याची चर्चा रंगली आहे.

<div class="paragraphs"><p>Garbage In Dhule city</p></div>
भाजपला भिडण्यासाठी शिवसेनेचे यंदा खानदेशी कार्ड?

कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस प्रॉडक्ट्सच्या कामाबाबत लेखापरीक्षणाचा ठराव झाल्यानंतर औरंगाबादचे अधिकारी लेखापरीक्षणासाठी महापालिकेत आले. मात्र, आपल्याला संबंधित विषयाच्या नस्त्या, फायली उपलब्ध केल्या नाहीत. त्यामुळे लेखापरीक्षण अपूर्ण राहिले, असे लेखापरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनीच सांगितल्याचा खुलासा सभापती जाधव यांनी मांडला.

<div class="paragraphs"><p>Garbage In Dhule city</p></div>
अजित पवारांची पाठ फिरताच भुसावळकरांवरील त्यांची ‘पॉवर’ संपली?

त्यावर अधिकाऱ्यांनी नस्त्या पुरविल्याचे सांगितले. त्यामुळे लेखापरीक्षक खोटे बोलत आहेत की महापालिकेचे अधिकारी, असा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला. दरम्यान, लेखापरीक्षणाच्या सर्व फायली गायब होतील, पुरावे जाळून टाकले जातील, असा इशारा सदस्य बोरसे यांनी दिला.

या कंपनीला महापालिकेने नव्या घंटागाड्या दिल्या होत्या. या सर्व घंटागाड्यांची अवस्था सध्या अतिशय वाईट आहे. यातील काही गाड्या गॅरेजमध्ये दुरुस्तीला पाटवण्यात आल्या होत्या. मात्र त्याचे बील कोणी अदा करावे या वादातून त्या गाड्या सध्या गॅरेजमध्ये पडून आहेत. एकंदर धुळे शहर सध्या कचऱ्याचे, वादग्रस्त भुयारी गटार योजनेमुळे चर्चेत आले आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com