Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar BawankuleSarkarnama

Nashik Loksabha Constituency : भाजपने नाशिक मतदारसंघावरील दावा सोडला; शिवसेनेचा जीव भांड्यात!

Chandrasekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक मतदार संघाच्या उमेदवारीबाबत वक्तव्य केलं आहे.

Mahayuti Politics News: मागील दोन महिने सुरू असलेला नाशिक मतदार संघाचा वाद आता सुटण्याची चिन्हे आहेत. भाजपने या मतदारसंघावरील दावा सोडला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.

नाशिक मतदारसंघाबाबत मंगळवारी दिवसभर अतिशय वेगवान घडामोडी घडल्या त्यामुळे राजकीय वातावरण अचानक तापले. सकाळी भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन(GIRISH MAHAJAN)  यांनी नाशिकला भेट दिली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. त्यानंतर नाशिकच्या मतदारसंघातील राजकीय परिस्थितीची माहिती घेण्यात आली. महायुतीकडून नाशिकमध्ये उमेदवार जाहीर करण्याच्या हालचाली त्यामुळे गतिमान झाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrasekhar Bawankule
Nashik Constituency 2024 : मतदारसंघ शिंदेंचा, धावपळ फडणवीसांच्या शिलेदाराची अन् दावेदारी भुजबळांची !

सायंकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमध्ये भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे बैठक घेतली. यावेळी त्यांनी मतदारसंघाचा राजकीय आढावा घेताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेच्या राजकीय हालचालींचाही आढावा घेतला. नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी नाशिक मतदार संघावरील भारतीय जनता पक्षाचा दावा सोडल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता नाशिक (NASHIK)  मतदार संघात उमेदवारी जाहीर करण्याचा मार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोकळा झाला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून अद्यापही दावा कायम आहे. त्यावर काय तोडगा काढला जातो याची उत्सुकता आहे.

ग्रामविकास मंत्री महाजन आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जवळपास दीड तास नाशिक मतदारसंघातील राजकीय आढावा व विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. येत्या गुरुवारी महायुतीचे उमेदवार आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांची मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन देखील करण्यात येणार आहे. त्याला पुरेसा वेळ मिळावा यासाठी बुधवारी सकाळी उमेदवाराची घोषणा होईल, असे यावेळी महाजन यांनी स्पष्ट केले.

Chandrasekhar Bawankule
Nashik Lok Sabha Election 2024 : 'शांतिगिरी महाराज माघार घेणार? महायुतीच्या संकटमोचकांनी घातली गळ...

महायुतीमध्ये नाशिक मतदारसंघावर शिवसेनेचा गटाचा दावा आहे. येथील विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळेल,अशी अपेक्षा आहे. याबाबतचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी गेले दोन आठवडे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. शिवसेनेसाठी अनुकूल वातावरण व्हावे, म्हणून जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांची भेट घेऊन त्यांना माघार घेण्याची विनंती दोन दिवसांपूर्वी केली होती. आता भाजपने सक्रिय होत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे जागावाटप आणि उमेदवार या दोन्हींचा निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते आज घेऊ शकतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघाचा उमेदवार केव्हाही जाहीर होऊ शकतो. त्याबाबत आता महायुतीच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com