

Congress Shrirampur : काँग्रेस ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यात डावपेच आखायला सुरूवात केली आहे. काँग्रेसला अच्छे दिन आणून द्यायचे, असा चंग बाळासाहेबांनी आखलेला दिसतो.
याचा कुठेही गाजावाजा न करता, थोरातांनी काँग्रेससाठी कार्यकर्त्यांची सुरू केलेली 'रनमशिन', अशीच सुरू राहिल्यास विरोधकांची डोकेदुखी ठरेल, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला (Mahayuti) जोरदार धक्का दे, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवकांचा आणि शहराध्यक्षांचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक शामलिंग शिंदे, गटनेते राजेंद्र पवार, रईस जहागिरदार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या फादर बॉडीचे शहराध्यक्ष अभिजित लिप्टे, माजी नगरसेविका प्रणिती दीपक चव्हाण, 'मर्चंट'चे संचालक दत्तात्रय धालपे, योगेश जाधव, नीलेश बोरावके यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.
यावेळी काँग्रेस स्थानिक युवा नेते करण ससाणे, काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर, सभापती सुधीर नवले, अंजुमभाई शेख, मुज्जफर शेख, मुन्ना पठाण, रितेश रोटे, कलीम कुरेशी, के. सी. शेळके, नीलेश नागले व्यासपीठावर उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले, "श्रीरामपूरची जनता स्वाभिमानी असून येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होईल. (कै.) जयंतराव ससाणे यांच्या कार्यकाळात श्रीरामपूर नगरपरिषदेचा नावलौकिक हा राज्यात होता. मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाले, तो काळ श्रीरामपूरसाठी सुवर्णकाळ होता.परंतु काही विघ्न संतोषी लोकांना ते देखवले नाही.
त्यांनी श्रीरामपूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु विधानसभा निवडणुकीच्या वेळी श्रीरामपूरकरांनी आमदार हेमंत ओगले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणत, त्यांना धडा शिकवला." त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत श्रीरामपूर नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल आणि मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार हेमंत ओगले यांनी, यावेळी काँग्रेस पक्षात सगळ्यांचे स्वागत केले व येणाऱ्या काळात (कै.) ससाणे साहेबांप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन काम करू, असे सांगितले. करण ससाणे यांनी, आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवला, त्याबद्दल आपले आभारी आहे. येत्या काळात बरोबरीने काम करू, असे सांगितले.
जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी, हे प्रवेश शुभ शकुन, असून श्रीरामपूरची विस्कटलेली घडी बसविण्याकरिता या सर्व सहकाऱ्यांचा फायदा होईल. श्रीरामपूर इथली गुंडगिरी आणि नशेखोरी संपविणे हा निवडणुकीतील मुख्य अजेंडा असेल, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.