Anup Agrawal Politics: भाजपच्या आमदाराला फडणवीसांच्या गृहखात्यावर भरोसा नाय का?...

BJP Anup Agarwal; Ruling BJP MLA Anup Agarwal directly accused Dhule city police-भाजपचे धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले
BJP MLA Anup Agrawal
BJP MLA Anup AgrawalSarkarnama
Published on
Updated on

Anup Agrawal News: धुळ्याचे भाजपचे आमदार अनुप अग्रवाल मतदारसंघातील पोलिसांवर चांगलेच संतापले आहेत. त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. त्यामुळे भाजपचे आमदार अनुप अग्रवाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

धुळे शहरात गेले काही महिने सत्ताधारी भाजप विरुद्ध विरोधी पक्षातील विविध नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शहरातील दुरावस्था आणि महापालिकेच्या समस्यांवरूनही भारतीय जनता पक्षाला टार्गेट करण्यात आले आहे. शहराच्या विविध समस्यांबाबत आणि प्रशासकीय गैर व्यवहारांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तक्रारी केल्या होत्या.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे अन्य पक्ष आणि भाजप यांच्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी मतदारसंघातील अनेक समस्यांबाबत प्रशासनाला जबाबदार धरल्याने सत्तेत कोण आणि विरोधात कोण असा भ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

BJP MLA Anup Agrawal
BJP Suresh Dhas son Sagar accident : भाजप आमदार धस यांच्या मुलाच्या वाहनाचा अपघात; धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

राज्यात भाजपचे सरकार आहे. गृह खाते भाजपच्याच अखत्यारीत आहे. मात्र अनुप अग्रवाल यांनी आपल्या मतदारसंघात अल्पसंख्यांक समाजाच्या कायदा हातात घेण्याचा प्रकारांकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. निमित्ताने त्यांनी आपल्याच पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या यंत्रणेवर अविश्वास व्यक्त केल्याने तो चर्चेचा विषय आहे.

आमदार अग्रवाल यांनी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या घटनेचा उल्लेख करीत पोलिसांनी कायदा हातात घेण्याच्या या घटनेकडे उदासीन दृष्टिकोन बाळगला. वक्फ बोर्डाच्या निर्णयाला विरोध करताना आंदोलन करण्यात आले. त्यात विनापरवाना विविध भागाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्याबाबत अहिल्यानगर पोलीस ठाण्यात वीज वितरण कंपनीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र कोणावरही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असल्याचे आमदार अग्रवाल म्हणाले.

मुंबई आग्रा महामार्गावरील काही भागांमध्ये तसेच हजार खोली आणि अन्य ठिकाणी विशिष्ट व्यापाऱ्यांना टार्गेट करण्यात येते. या भागात रात्रभर दुकाने सुरू असतात. अनेक वादविवाद आणि मारहाणीच्या घटना घडतात. याबाबत राज्य शासनाने पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत, ची मागणी आमदार अग्रवाल यांनी केली.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com