Nashik BJP : नाशिकमध्ये काय घडलं? भाजपच्या इतिहासातील सर्वांत मोठी हकालपट्टी, माजी महापौरांसह 54 जण बाहेर

Nashik BJP Action : मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना नाशिकमध्ये भाजपने बंडखोरांवर मोठी कारवाई केली आहे. ही भाजपच्या इतिहासात सर्वात मोठी हकालपट्टीची कारवाई मानली जात आहे.
 BJP politics
BJP politicsSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना भाजपने नाशिकमध्ये हकालपट्टीचे शस्र बाहेर काढले आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्याच अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या तब्बल ५४ जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या, तसेच अपक्ष व इतर राजकीय पक्षांकडून उमेदवारी करत असलेल्या वीस माजी नगरसेवकांसह एकुण ५४ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भाजपने हकालपट्टी केली आहे. विशेष म्हणजे यात माजी महापौरांचाही समावेश आहे. ही भाजपच्या इतिहासात सर्वात मोठी हकालपट्टीची कारवाई मानली जात आहे.

नाशिक महापालिकेसाठी भाजपने शंभर प्लसचा नारा दिला होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात भाजपने इतर पक्षातील मात्तबर नेत्यांना भाजपमध्ये घेतलं. त्यांना उमेदवारीचा शब्दही दिला होता. त्यात भाजपमध्ये इच्छुकांची संख्या सर्वांधिक होती. नगरसेवक पदाच्या १२२ जागांसाठी एकूण १,०७७ जणांनी मुलाखती दिल्या. परंतु केवळ १२२ जागा असल्याने सर्वांना उमेदवारी देता येणे शक्य नव्हते. त्यात महायुती होणार की नाही हे देखील ठरेलेले नव्हते.

 BJP politics
Pankaja Munde : सकाळी सासऱ्यांचा अंत्यविधी, दुपारी अश्रूंना रोखत थेट नाशिकच्या सभेत ! पंकजा मुंडेंची पक्षनिष्ठा पाहून गिरीश महाजन भारावले

अखेर शेवटी भाजपने प्रतिसाद न दिल्याने शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने युतीची घोषणा केली. त्यातून भाजपचा स्वबळाचा मार्ग मोकळा झाला. भाजपने ११८ उमेदवार जाहीर केले. त्यात पक्षाच्या एबी फॉर्मचा मोठा गोंधळ उडाला. त्यातून भाजपच्याच काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे अनेक नाराजांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. तर काहींनी इतर पक्षांकडून मिळालेली उमेदवारी कायम ठेवली.

भाजपकडून अन्य पक्षातून ३३ जणांना उमेदवारी देण्यात आल्याने बंडखोरी उफाळून आली. बंडखोरी व नाराजीचा भाजपमध्ये भडका उडाला. प्रभाग १३ मधील भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयासमोरच आंदोलन केले तर शहराध्यक्ष सुनील केदार यांना कोंडून ठेवून निषेध म्हणून गाजरे देखील दिले. बंडखोरी रोखण्यासाठी भाजपने बरेच प्रयत्न केले पण भाजपला पूर्णपणे यश आले नाही. अखेर या बंडखोरांवर भाजपने धडाकेबाज कारवाई केली आहे.

 BJP politics
Pankaja Munde : फडणवीस-महाजनांच्या शेजारी बसलेल्या पंकजा मुंडे भाषणासाठी उठल्या, म्हणाल्या.. 'विकासाच्या आड येणाऱ्यांना छाटा'

पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी केल्याने पक्ष शिस्त मोडीत निघाली व अपक्ष, अन्य पक्षांकडून निवडणूक लढविली जात असल्याने हकालपट्टीची कारवाई करण्यात आली असल्याचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले.

यांची झाली हकालपट्टी

माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी सभागृह नेते शशिकांत जाधव, सतीश सोनवणे व कमलेश बोडके, माजी गटनेते दिलीप दातीर, अनिल मटाले, माजी नगरसेवक पुनम सोनवणे, मिरा हांडगे, सुनीता पिंगळे, अंबादास पगारे, अलका अहिरे. रुची कुंभारकर, मुकेश शहाणे, पंडीत आवारे, दामोदर मानकर, कन्हय्या साळवे, वंदना मनचंदा, शीला भागवत, नंदीनी जाधव, बाळासाहेब पाटील, राजेश आढाव, जितेंद्र चोरडीया, सचिन मोरे, अमित घुगे, ज्ञानेश्वर काकड, ज्ञानेश्वर पिंगळे, चारुदत्त आहेर, तुषार जोशी, सचिन हांडगे, प्रकाश दिक्षीत, रतन काळे, ऋषीकेश आहेर, ऋषीकेश डापसे, कैलास अहिरे, सतनाम राजपूत, गणेश मोरे, किरण गाडे, मंगेश मोरे, शाळिग्राम ठाकूर, कल्पेश ठाकूर, मनोज तांबे, शरद शिंदे, शरद इंगळे, प्रभा काठे, स्मिता बोडके, योगिता राऊत, बाळासाहेब घुगे, शंकर विधाते, प्रेम पाटील, रत्ना सातभाई, सविता गायकर, राहुल कोथमिरे, शीतल साळवे, एकनाथ नवले यांचा हकालपट्टी मध्ये समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com