Dr.  Bharti Pawar
Dr. Bharti PawarSarkarnama

BJP Politics : डॉ. भारती पवार झाल्या पहिल्याच टर्मला दोन खात्याच्या मंत्री!

BJP Centre Politics, Dr. Bharti Pawar got additional charge of Trible Devolopment- डॉ. भारती पवार यांच्यावर विश्वास दाखवत भाजपने सोपवला आदिवासी विभागाचा अतिरिक्त पदभार.
Published on

Trible Politics : नाशिकला केंद्राच्या राजकारणात पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे डॉ. भारती पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार झाल्या, मात्र त्या आरोग्य तसेच आदिवासी विकास या दोन खात्याच्या राज्यमंत्री झाल्याने त्यांच्या समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे. (BJP given additional charge of Trible Devolopment to Dr. Bharti Pawar)

नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भाजपचे (BJP) बारा खासदार कत्याच झालेल्या आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे त्यांना राजीनामे द्यावे लागले. त्यात नाशिकच्या (Nashik) डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांना राज्यमंत्री म्हणून एका विभागाची लॉटरी लागली आहे.

Dr.  Bharti Pawar
Eknath Shinde : ठाकरे गटाने काढले हुकमी अस्त्र; शिंदेंवर बाजी उलटणार?

राजकारणात काय घडेल, कोणाला कोणती संधी मिळेल हे नेहेमीच अनिश्चित राहिले आहे. तसेच काहीसे नाशिकच्या डॉ. पवार यांच्याबाबत देखील घडले आहे. दिंडोरी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्यांदा पराभूत झाल्यावर दुसऱ्यांदा त्यांनी भाजपची उमेदवारी केली. त्याविजयी झाल्या व पहिल्यांदाच खासदार झाल्या. मात्र या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना आपला प्रभाव दाखवत राज्यमंत्री झाल्या. आता त्यांना आणखी एका विभागाचा कार्यभार मिळाल्याने तो चर्चेचा विषय आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे आदिवासी विकास विभागाच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार व राज्यमंत्री खासदार रेणुका सिंग यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने हा अतिरिक्त पदभार डॉ. पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने डझनहून अधिक खासदारांसह केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. यातील १२ हून अधिक मंत्री विजयी झाले आहेत. त्यांचा राजीनामा मंजूर कऱण्यात आला. त्यात रेणुका सिंग होत्या. गुरुवारी डॉ. पवार यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. डॉ. पवार यांनी शुक्रवारी त्यांनी पदभार स्वीकारत कामकाजाला सुरवात केली.

Dr.  Bharti Pawar
Maratha Reservation : अंतरावली सराटीतील आंदोलकांवरील गुन्हे मागे नाही; काय सांगतो क्लोजर रिपोर्ट ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com