Devendra Fadnavis wishes Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंचा आनंद गगनात मावेना; मुख्यमंत्री फडणवीसांकडून आल्या शुभेच्छा!

Devendra Fadnavis Greets Nashik MLC Satyajeet Tambe on Birthday in Sangamner : भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् आमदार सत्यजीत तांबे यांच्यातील मैत्री नेहमीच चर्चेत आहे.
Devendra Fadnavis wishes Satyajeet Tambe
Devendra Fadnavis wishes Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

Sangamner political news : काँग्रेस विचारसरणी असलेल्या थोरात कुटुंबांतील नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे अन् भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत, सत्यजीत तांबे यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली. महाविकास आघाडीचा उमेदवार असताना देखील सत्यजीत तांबे यांनी या निवडणुकीत विजयश्री खेचून आणला. यात कुठेतरी भाजपचं पाठबळ होत, अशी आजही चर्चा आहे. तसा या चर्चांना वेळोवेळी घडणाऱ्या राजकीय कृतीनं उधाण येते.

असंच पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. सत्यजीत तांबेंचा काल वाढदिवस झाला. अगदी साध्यापद्धतीने साजरा झाला. नेत्याचा वाढदिवस म्हटल्यावर कार्यकर्त्यांमध्ये संचारतं, पण तसं काही सत्यजीत तांबे होऊ देत नाही. परंतु एक मोठी राजकीय घडामोड घडली. भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजीत तांबेंना त्यांच्या वाढदिवसाच्या आवर्जुन शुभेच्छा दिल्या. तसं मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या खात्यांवर भगव्या रंगामध्ये पोस्ट शेअर केली. मुख्यमंत्र्यांच्या या शुभेच्छामुळे सत्यजीत तांबे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

नाशिक पदवधीर मतदारसंघीचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना पुन्हा उधाण आले. विशेष म्हणजे, भाजप व्यतिरिक्त इतर कोणत्याही आमदाराला शुभेच्छा देण्याची ही फडणवीसांची पहिलीच वेळ असल्याचा दावा, सत्यजीत तांबे यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. त्यामुळे या शुभेच्छा केवळ वैयक्तिक आहेत की, त्यामागे राजकीय संदेश दडलेत, यावर खल होता.

सत्यजीत तांबे हे काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरातांचे भाचे. (कै.) राजीव राजळे यांचे मावस बंधू. राजीव राजळेंमुळेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी सत्यजीत तांबे यांच्याशी संपर्क आला. पुढे राजकीय घडामोडी घडत जात फडणवीस यांच्याशी संपर्क येत होता. पण, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी मैत्री फुलली.

Devendra Fadnavis wishes Satyajeet Tambe
Vivek Kolhe Vs Ashutosh Kale : उपकाराची जाण ठेवली नाही, युती तुटल्याचं जाहीर; विवेक कोल्हेंनी आमदार काळेंविरोधात ठोकला शड्डू!

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत, सत्यजीत तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष म्हणून सामोरे गेले. सत्यजीत तांबे यांना या निवडणुकीत भाजप पाठिंबा होता. हा पाठिंबा आजही संशोधनाचा विषय आहे. सत्यजीत तांबे यांनी या निवडणुकीत कमालीचा विजय मिळवला. यानंतर त्यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सातत्याने गाठीभेटी होत आहेत. विधिमंडळातील भेटीगाठी, चर्चासत्रे आणि कार्यक्रमांमध्ये फडणवीस आणि तांबे एकत्र दिसतात.

Devendra Fadnavis wishes Satyajeet Tambe
Balasaheb Thorat : 'कलेक्टर नाचगाणी करतो, सरकार किती गंभीर'; शेतकऱ्यांचा संताप ओळखा, थोरातांचा सूचक सल्ला

फडणवीस–तांबे समीकरण

सत्यजीत तांबे यांनी अनुवाद केलेल्या CitizenVille पुस्तक प्रकाशनावेळी, फडणवीस यांनी, “तुम्ही सत्यजीतला किती दिवस बाहेर ठेवणार? नाहीतर आमचाही डोळा आहे सत्यजीतवर!” या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. सत्यजीत तांबे यांची राज्याच्या सुधारीत युवा धोरण समिती आणि महत्त्वाच्या लोकलेखा समितीवर (PAC) नियुक्ती झाली आहे. ही निवड अधिकृतरीत्या नियमानुसार असली, तरी राजकीय वर्तुळात यामागे फडणवीस–तांबे समीकरण असल्याची चर्चा आहे.

संगमनेरमध्ये राजकीय उलथापालथीचे संकेत

संगमनेर विधानसभा मतदारसंघात विधानसभेला फासे उलटे फिरले. महायुती आमदार झाला. सत्यजीत तांबे यांचे मामा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा धक्का बसला. संगमनेर राजकीय प्रयोगशाळा झाली आहे. राजकीय संघर्ष उफाळतो आहे. यात सत्यजीत तांबे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी असलेली मैत्री महत्त्वपूर्ण ठरते आहे. भविष्यातील ही मैत्री संगमनेरमध्ये मोठ्या राजकीय बदलाची नांदी ठरेल, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com