Nashik News; भाजप गोंधळलेला...संभाजीराजेंनी मात्र उमेदवार दिला!

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी स्वराज्य संघटनेकडून सुरेश पवार यांना उमेदवारी.
Chhatrapati Sambhajiraje
Chhatrapati SambhajirajeSarkarnama

नाशिक : (Nashik) पदवीधर संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोज नव्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. भारतीय जनता पक्ष (BJP) आणि मुख्यमंत्री शिंदे गट (Eknath Shinde) उमेदवारीबाबत अद्याप गोंधळलेला आहे. मात्र आज खासदार संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांच्या स्वराज्य संघटनेने (Swarajya) अपक्ष सुरेश पवार (Suresh Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे. (Swarajya Sanghtna declaired support to Suresh Pawar in Nashik)

Chhatrapati Sambhajiraje
Breaking; शुभांगी पाटील यांच्यासाठी मुंबईतून 25 नगरसेवकांसह शंभर जणांची रसद!

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता स्वराज्य संघटनेने देखील उडी घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीला नवीन वळण मिळाले आहे. एकंदर सोळा उमेदवार असलेल्या या निवडणुकीत अपक्ष सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यात मुख्य लढत आहे.

Chhatrapati Sambhajiraje
Shivsena News: `भाजप`ला लायक उमेदवारही मिळत नाही

स्वराज्य संघटनेकडून पत्रकार परिषदेत अपक्ष उमेदवार सुरेश पवार यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. नाशिकचे दोन्ही प्रमुख उमेदवार पळपुटे आहेत. एका उमेदवाराला अजूनही पक्षाचा पाठिंबा मिळत नसल्याची टीका स्वराज्य संघटनेने केली आहे. आम्ही पूर्ण ताकतीने सुरेश पवार यांना निवडून आणण्याचा निर्धार स्वराज संघटनेने केला आहे. त्यामुळे पुन्हा एक नवा ट्वीस्ट नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पाहायला मिळत आहे.

'सुरेश पवार यांनी काल छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वराज्य संघटनेत प्रवेश केला आहे. संभाजी राजे छत्रपती यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. श्री. पवार कालपासून स्वराज्याचे घटक झाल्यामुळे संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. स्वराज्य संघटनेचे ते अधिकृत उमेदवार जरी नसले तरी देखील स्वराज्याचे घटक असल्यामुळे आमची जबाबदारी आहे की सुरेश पवार यांच्या पाठीशी स्वराज्याची ताकद उभी करून त्यांना या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आणणे. हे एकमेव ध्येय आहे.

याबाबत संघटनेचे प्रवक्ते करण गायकर म्हणाले, जे दोन उमेदवार या निवडणुकीत चर्चेत आहेत, ते पळकुटे उमेदवार आहेत. त्यांना निष्ठा नाही. पदवीधर ही निष्ठावंतांची निवडणूक असते, त्यामुळे मतदार विचारपूर्वक मतदान करतील, अशी टीका उमेदवार श्री. तांबे आणि श्रीमती शुभांगी पाटील यांच्याबाबत त्यांनी केली.

विधान परिषदेची ही निवडणूक पक्षविरहित होतात. काही चांगली लोकं त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून गेली पाहिजे. पदवीधरांचे प्रश्न मांडले गेले पाहिजे. मात्र त्याला या सर्व राजकीय पक्षांनी छेद दिले आहेत. दरम्यान सुरेश पवार छत्रपतींचे विचार आणि स्वराज्य संघटनेचे नाव घेऊन मतदारांपर्यंत पोहोचतील आणि निश्चितपणे मतदार सुद्धा त्यांना पाठिंबा देईल तसेच त्यांना निवडून आणेल' असा विश्वास गायकर यांनी व्यक्त केला आहे.

'जे उमेदवार स्वतःला या मतदारसंघात निवडणुकीसाठी मालकी हक्क समजत आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की लोक, मतदार जागे झाले आहे. लोकशाहीमध्ये तुमची दादागिरी, तुमची संपत्ती, तुम्ही केलेले कपटकारस्थान हे चालणार नाहीत. लोकांना सर्व माहीत झाले आहे. तुम्ही तुमच्या आमदारकींसाठी किती फसवा फसवीचे राजकारण करत आहेत.. किती पळवा पळवीचे राजकारण केले आहे. आमचे उमेदवार चांगल्या पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाईल' असा घणाघातही करण गायकर यांनी यावेळी केला.

यावेळी प्रा. उमेश शिंदे, संतोष माळोदे, विजय खर्जुल, आशिष हीरे, पुंडलिक बोडके, डॉ रुपेश नाठे, योगेश आबा सोनवणे, ज्ञानेश्वर थोरात, अॅड मयूर पांगारकर, नितीन पाटील, गिरीश आहेर, योगेश गांगुर्डे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com