BJP Vs Congress Politics : भाजप कार्यकर्त्यांचा भल्या सकाळी काँग्रेस कार्यालयावर हल्ला बोल?

BJP-Congress Politics. BJP Followers agitation on Savarkar issue in City-मंत्री प्रियांक खर्गे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलनात भाजपने थेट काँग्रेस कार्यलयाला लक्ष्य केले?
BJP agitation in Nashik
BJP agitation in NashikSarkarnama
Published on
Updated on

Nashik BJP News : काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी सावरकरांविषयी केलेल्या विधानामुळे भाजप संतप्त आहे. याबाबत भाजपने काल थेट काँग्रेस कार्यालयालाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनावेळी पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. यावेळी काँग्रेस कार्यालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (BJP youth wing workers agitation against Congress leader Priyank Kharge inNashik)

काँग्रेसचे (Congress) मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विरोधात भाजपने (BJP) काल शहरात आंदोलन केले. मात्र हे आंदोलन वेगळ्यात कारणाने चर्चेत आहे. यावेळी भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस कार्यालायपुढे (Nashik) गोंधळ घातला. त्यामुळे हा विषय पेटण्याची चिन्हे आहेत.

BJP agitation in Nashik
BJP Politics : डॉ. भारती पवार झाल्या पहिल्याच टर्मला दोन खात्याच्या मंत्री!

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र व काँग्रेसचे कर्नाटकमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ‘भाजयुमो’तर्फे शुक्रवारी रेड क्रॉस सिग्नल येथे प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी काँग्रेस भवनसमोर कार्यकर्ते जमल्याने पक्षाच्या कार्यालयाला लक्ष करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.

कर्नाटकमधील काँग्रेसचे मंत्री खर्गे यांनी कर्नाटक विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकावी, अशी मागणी केली होती. याविरोधात सावरकरप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ‘भाजयुमो’तर्फे शुक्रवारी शहरात तिरडी आंदोलन करण्यात आले. खर्गे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला.

काँग्रेसच्या नेत्यांनी सावरकर यांच्याविरोधात बोलणे बंद करावे व अशा वाचाळ वीरांच्या समर्थनार्थ पुढे येणाऱ्यांनी सावध व्हावे अन्यथा आमच्या विरोधाचा सामना करावा लागेल, असा इशारा युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला. भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी यावेळी दिला.

यावेळी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सागर शेलार, लोकसभा समन्वयक गिरीश पालवे, सरचिटणीस नाना शिलेदार, वसंत उशीर, शहर उपाध्यक्ष मीनल भोसले, प्रदेश महामंत्री योगेश महिंद, प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत पाटील, क्रीडा संयोजक विजय बनसोडे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सोनाली ठाकरे, सरचिटणीस शिवा जाधव, डॉ. वैभव महाले आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.

BJP agitation in Nashik
Eknath Shinde : ठाकरे गटाने काढले हुकमी अस्त्र; शिंदेंवर बाजी उलटणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com