BJP: भाजपला घरचा आहेर; रस्ते निकृष्ठ दर्जाचे का आहेत?

धुळे महापालिका सभेत भाजप नगरसेवक रेलन यांनी पदाधिकाऱ्यांना दाखवला आरसा.
Harshkumar Relan
Harshkumar RelanSarkarnama
Published on
Updated on

धुळे : धुळेकरांच्या (Dhule) भावना महापालिका सभागृहात मांडणे कर्तव्य समजतो. आपल्याकडे रस्ते चांगले होत नाहीत, अशी लोकभावना आहे. यात आपली काही चूक होत आहे का? एकीकडे ट्रॅफिक वाढत आहे. दसऱ्याला पाचशे वाहनांची खरेदी-विक्री झाली. तीच वाहने शहरात धावतील. आधीच आहे त्या रस्त्यांचा (Roads) ठिकाणा नाही, त्यात नवीन वाहनांचा भार आपण कसा सोसू, दर्जात्मक रस्त्यांबाबत (Worst Quality of city roads) काय नियोजन करू शकू, अशा ज्वलंत प्रश्‍नांची सत्ताधारी भाजपचे (BJP) नगरसेवक हर्षकुमार रेलन (Harshkumar relan) यांनी सरबत्ती केली. (Corporator Harshkumar relan question BJP on Worst quality of Roads in City)

Harshkumar Relan
Shivsena: शिंदे गटाच्या कारकर्त्यांना चोपणाऱ्या रणरागिणींचा शिवसेनेकडून सन्मान

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती शीतल नवले यांच्या अध्यक्षस्थानी झाली.यावेळी नगरसेवक रेलन यांनी रस्त्यांप्रश्‍नी धुळेकरांच्या भावनांना हात घातला. सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न केला.

Harshkumar Relan
फडणवीसांच्या दत्तक नाशिकसाठी शिंदे गटाची फिल्डींग!

ते म्हणाले, जिथे एम २० या पक्क्या क्राँक्रिटीकरणाची गरज आहे तिथे एम १० कच्च्या क्राँक्रिटीकरणाची कामे होतात का? रस्ते लगेचच खराब का होतात? खड्डेमय कसे होतात? याबाबत आपल्याच नागरिकांचे हाल होत असतील, तर कुठे तरी चूक होत आहे. मनपाकडे दर मंजुरीसाठी प्रस्ताव येतात, तसे काम झाल्यानंतर दर्जा मंजुरीसंबंधी प्रस्तावांद्वारे प्रमाणपत्र दिले पाहिजे. रस्त्यांप्रश्‍नी नगरसेवकाला नागरिकांच्या तोफेच्या तोंडी जावे लागते.

एमबी रेकॉर्ड कोण करतो?

यापूर्वी मनपाचे अधिकारी पावटे यांच्या कामाबाबत तक्रार केली. गटार जागेवर दिसत नाही, असे निदर्शनास आणल्यावर त्यांनी त्याच परिसरात कुठे तरी गटार केल्याचे सांगितले. मग एमबी रेकॉर्डमध्ये तशी नोंद केली आहे का? कारण कुणी तरी वेगळाच व्यक्ती एमबी रेकॉर्ड करतो, अशी धक्क्दायक बाब समोर येते. अकाउंट विभाग, मुख्य अभियंता, उपायुक्त, आयुक्त कागदपत्रे बघतात, पण काम तपासतात का? चुकीच्या कामाचे बिल दिले गेले, गटार, रस्ते कमी लांबीचे बनविले, तर जबाबदारी कुणाची? याबाबत आयुक्त व शहर अभियंत्यांनी खुलासा करावा.

शहरात २०१९ पासून डबल एंट्री अकाऊंट सिस्टमची मागणी करीत आहे. त्यामुळे मनपाला किती इस्टेट, किती भूखंडांचे मूल्य काय हे समजू शकेल. मनपाचे इस्टेट मॅनेजर कोण आहेत, त्यांचे काम काय आहे, अकाउंट विभाग काय करतो याचेही धुळेकरांना उत्तर मिळावे, अशी मागणी नगरसेवक रेलन यांनी केली.

सभापती नवलेंची भूमिका

सभापती नवले म्हणाले, की कनिष्ठ अभियंता एमबी लिहितात. त्यांनी तसे केले नसेल, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करू, त्यांना निलंबित करू. मानधनावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मुद्यावर प्रतिभा चौधरी यांनी किमान वेतन कायद्यानुसार त्यांनी वेतन घ्यावे, नागसेन बोरसे यांनीही ज्यांचे वेतन ८ हजार आहे, त्यांच्या वेतनात १४ हजारांपर्यंत वाढ करावी, अंगणवाडीसेविकांच्या मानधनातही वाढ करावी, मानधनावरील कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन नाही, किमान दिवाळीत वेतन द्यावे, अशी मागणी केली. नगरसेवक रेलन यांनी वेतन वाढवा. मात्र, महापालिकेचे उत्पन्न किती, असा प्रश्‍न केला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य संजय जाधव, श्री. रेलन, साबीर शेख, नागसेन बोरसे, प्रतिभा चौधरी आदी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com