आमदार शाह यांनी ठेकेदारांकडून १४ टक्के कमिशन घेतले?

भाजपचे नगरसेवक नागसेन बोरसे यांचा स्थायी समितीच्या सभेत आरोप.
Dhule Corporation
Dhule CorporationSarkarnama
Published on
Updated on

धुळे : शहरातील (Dhule) ठेकेदारांकडून १४ ते १५ टक्क्यांनी पैसे गोळा केले. मात्र, कामांची प्रशासकीय मान्यता रद्द झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांनी (Contractors) पैसे परत करण्याचा तगादा सुरू केला. ठेकेदारांच्या या तगाद्यामुळे शहराचे आमदार (Faruk Shah) ३० कोटींच्या निधीतील रस्तेप्रश्‍नी महापालिकेविरोधी (Dhule Corporation) कारवाया करत असल्याचा खळबळजनक आरोप मनपातील सत्ताधारी भाजप नगरसेवक नागसेन बोरसे (Nagsen Borase) यांनी स्थायी समितीच्या सभेत केला. (BJP corporator Nagsen Borase made seriousalligation on AIMIM MLA)

Dhule Corporation
भाजपच्या नेत्यांनी किती टक्केवारी घेतली ते जाहीर करेन!

सभेत श्री. बोरसे यांनी महापालिकेने शहराच्या देवपूर भागासाठी ३३ कोटी रुपये आणले. दरम्यान, या निधीवरून शहराचे आमदार फारूक शाह आता महापालिकेविरोधात लढाई करत असून, महापालिकेने केलेला कामांचा ठराव रद्द करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

Dhule Corporation
नाशिकच्या रस्त्यांची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा!

प्रारंभी ३० कोटी निधीचा प्रकल्प मंजूर झाल्यानंतर शहराच्या आमदारांनी ठेकेदारांकडून १४ ते १५ टक्क्यांनी पैसे गोळा केले. मात्र संबंधित निधीतील कामांची प्रशासकीय मान्यता रद्द झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांनी आमदारांकडे पैशांचा तगादा सुरू केला. या तगाद्यामुळे आमदार महापालिकेविरोधात लढाई करत असल्याचा आरोप श्री. बोरसे यांनी केला. आमदारांच्या या कृतीबद्दल सभेत श्री. शाह यांच्या निषेधाचा ठराव करावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, या विषयावर सभापती शीतल नवले म्हणाले, की नियमाप्रमाणे आपण (महापालिका) ठराव रद्द करू शकतो. तो आपला अधिकार आहे. आमदारांनी ३० कोटींपैकी देवपूर भागासाठी केवळ नऊ कोटींची कामे घेऊन देवपूरवासीयांवर अन्याय केला होता. देव त्यांना सुबुद्धी देवो. या प्रकरणी आमदारांविरोधात तेवढ्याच ताकदीने लढू, असे श्री. नवले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com