भाजपच्या नगरसेवकांनी नागरिकांना वाऱ्यावर सोडले!

डीकेनगर वादाच्या वेळी एकही नगरसेवक फिरकला नाही
Kishor Shirsath
Kishor ShirsathSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : शहरातील (Nashik) डिकेनगर चौकीत तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागिरकांना पोलिसांचा त्रास झाला. मध्यरात्री तीन पर्यंत नागरिक व पोलिसांत वादविवाद सुरु होता. त्यावेळी भाजपचा (BJP) नगरसेवक असलेल्या या भागात एकही नगरसेवक फिरकला नाही. मात्र आयुक्तांच्या बैठकीत पहिल्या रांगेत बसुन भाषणे देण्यासाठी हीच मंडळी होती, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) विभागीय अध्यक्ष किशोर शिरसाठ (Kishor Shirsath) यांनी केला आहे. (BJP corporators forget cotizen issues)

Kishor Shirsath
आतुर झालेल्या फडणवीसांना अडीच वर्षे थांबावे लागेल!

गंगापुर रोड या उच्चभ्रू वसाहतींत नागरिकांना सध्या वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चार दिवसांपूर्वी येथे मद्यपी टोळक्याचा त्रास होत असल्याने तक्रार देण्यासाठी गेलेल्या श्री. शिंदे या नागरिकाला एक पोलिस चौकीतच दारु पीत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला मारहान केली. त्यामुळे हे प्रकरण चिघळले. पोलिस आयुक्तांपर्यंत प्रकरण गेल्याने चार पोलिसांचे निलंबन झाले. रात्री दहा पासून तर मध्यरात्री तीन पर्यंत हा वाद सुरु होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी नागरिकांसोबत होते.

Kishor Shirsath
दारू पिला एक, सस्पेंड झाले चार, त्यात एक माळकरी!

यासंदर्भात श्री. शिरसाठ म्हणाले, डीकेनगरचे प्रकरण सबंध शहरात चर्चेचा विषय ठरला. नागरिकांना त्याचा अतिशय त्रास झाला. या प्रभागात अनेक वर्षे भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांच्यापैकी कोणीही तीथे आले नाही. मात्र नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही पुढाकार घेऊन पोलिस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांना येथे बैठक घेण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. प्रत्यक्ष बैठक झाली तेव्हा भाजपचे नागरिक तेथे आले. पहिल्या रांगेत बसून भाषणे ठोकून गेले. नागरिक अडचणीत असताना गायब राहणाऱ्या भाजपच्या या नागरिकांनी गंगापूर रोड परिसरातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे. ते फक्त राजकारण करण्यात रस घेतात.

या भागातील उद्याने, मोकळ्या जागा, मैदाने व सार्वजनिक ठिकाणी सायंकाळ होताच मद्यपींची गर्दी होते. खुले आम ते दारु पितात. नागरिकांना त्रास देतात. आरडा-ओरड करून दहशत निर्माण करतात. येथी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. पथदीप बंद असतात. भाजीबाजाराच्या अडचणी आहेत. त्यासाठी पालकमंत्र्यांनी सहकार्य केले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विविध स्तरावर पाठपुरावा केला. मात्र या भागाचा आमदार भाजपचा, नगरसेवक भाजपचे त्यांनी नागिरकांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांची तड लावण्याचे काम आम्ही केले आहे व करीत राहू.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com