Yeola Water crisis : येवला मतदारसंघ सध्या मराठा आरक्षण समर्थक विरुद्ध मंत्री छगन भुजबळ यांच्यातील राजकीय वादाने ग्रस्त झाला आहे. या वादावादीपासून अंतर ठेवत भाजपने शेतकऱ्यांच्या पिकांना सावरण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. (BJP leader Amruta Pawar meets Irrigation secretary with Farmers)
येवल्यात (Nashik) पुरेसा पाऊस झालेला नसल्याने त्याची शेतीला झळ बसली आहे. याबाबत भाजपने (BJP) पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याकडे येवल्यासाठी पाणी (Water) सोडण्याची मागणी केली होती. आता त्यांनी याबाबत थेट जलसंपदा विभागाच्या सचिवांकडे मागणी केली आहे.
येवला मतदारसंघ राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. सध्या या मतदारसंघात गेल्या दोन महिन्यांपासून राजकीय ओढाताण सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मतदारसंघातील सकल मराठा समाज तसेच युवावर्ग आक्रमक आहे. भुजबळ मराठा आरक्षणाला विरोध करीत असल्याने येवल्यात राजकीय वातावरण तापले आहे.
या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात पाऊस झालेला नसल्याने शेतीचे नुकसान झाले. पिके करपली. त्यानंतर अवकाळी पावसाने नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर भाजपच्या पवार यांनी पालकमंत्री भुसे यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती. अद्याप पाणी मिळालेले नाही.
गुरुवारी याबाबत येवला तालुक्यात शेतीसाठी पाण्याची दोन आवर्तनं सोडण्यात यावीत, या मागणीसाठी जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांची मुंबईत मंत्रालयात भेट घेतली. येवल्यासाठी पाणी न सोडल्यास शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना त्याची गरज असल्याने लवकरात लवकर पाणी सोडण्याचा आग्रह धरला. या वेळी येवल्यातील संतू पाटील, सुरेश कदम, झुंजार देशमुख, सुभाष गायकवाड, भाऊसाहेब चव्हाण यांसह विविध शेतकरी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.