Maratha Reservation Issue : ‘भुजबळांनी मुंबईत पेरले, तेच येवल्यात उगवले’

Maratha Reservation v/s Bhujbal, There was acute oppose to Bhujbal in Yeola-छगन भुजबळ यांना आज विरोधामुळे स्वतःच्याच येवला मतदारसंघातील दौरा आटोपता घ्यावा लागला.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

Chhagan Bhujbal in Yeola News : राजकारणात अनेक घटनांचे बुमरँग होते, याची प्रचिती आज छगन भुजबळ यांना आपल्याच येवला मतदारसंघात आली. भुजबळ यांनी मुंबईचे महापौर असताना 1985 मध्ये मोर्चा आलेले हुतात्मा स्मारक गोमूत्राने शुचिर्भूत केले होते. आज येवला मतदारसंघात भुजबळ ज्या मार्गाने गेले तो रस्ता आंदोलकांनी गोमूत्राने शुचिर्भूत करून त्याची परतफेड केल्याचे पाहायला मिळाले. (Chhagan Bhujbal had leave the yeola visit halfway through due to Maratha Protester)

मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करणाऱ्या अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना आज त्यांच्या येवला (Nashik) मतदारसंघात मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांना आपला दौरा अर्धवट सो़डावा लागला.

Chhagan Bhujbal
Maratha v/s Bhujbal : भुजबळांची आंदोलकांना हुलकावणी, वेगळ्याच मार्गाने निघून गेले!

भुजबळ आज अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आपल्या मतदारसंघातील विविध गावांना भेटी देणार होते. त्यांनी हा दौरा करू नये, अशी विनंती सकल मराठा समाजातर्फे करण्यात आली होती. मात्र, त्यांनी ती जुमानली नाही. आज सकाळी आंदोलकांना टाळत, मोठ्या पोलिस बंदोबस्तात त्यांनी हा दौरा सुरू केला. मात्र, अखेर कोटमगाव आणि सोमठाणदेश या गावांत त्यांची मराठा आंदोलकांची गाठ पडलीच. या वेळी झालेल्या घोषणा, विरोधामुळे वातावरण तंग झाले होते.

सोमठाणदेश या गावात सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन तीव्र होते. त्याचे पडसाद आज मंत्री भुजबळ यांच्या दौऱ्यात उमटले. पाहणी दौऱ्याचा समारोप या गावात होण्याची अपेक्षा होती. मात्र, येथून भुजबळ यांच्या वाहनांचा ताफा रवाना होत असताना आंदोलक अतिशय आक्रमक झाले होते. त्यांनी येथे ‘भुजबळ गो बॅक’ अशा घोषणांचा गोंगाट केला. या वेळी वातावरण अतिशय तंग झाले होते. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असूनदेखील आंदोलक रस्त्याकडे पाठ करून बसून होते. त्यांनी भुजबळ यांच्याकडे पाठ करून त्यांना ‘भुजबळ गो बॅक’ घोषणांचा गोंगाट सुरू झाल्याने पोलिसदेखील तणावात आले होते.

या वेळी कोटमगाव येथे प्रचंड विरोध झाला. मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते. त्यांच्या या विरोधामुळे मोठा बंदोबस्त येथे होते. त्यानंतर सोमठाणदेश येथेदेखील अशाच तीव्र विरोधाचा सामना त्यांना करावा लागला. कोटमगाव येथे आंदोलकांनी त्यांना आमच्या बांधावर येऊ नका, असा इशारा देत विरोध केला. त्यामुळे सोमठाणदेश, कोटमगाव, वनसगाव, थेटाळे असा त्यांचा दाैरा होता. मात्र, सोमठाणदेश येथेच विरोध झाल्याने त्यांना पुढची गावे टाळून नाशिकला परतावे लागले.

या आंदोलनामुळे वातावरण तंग झाल्याने पोलिस अधीक्षक शहाजी उमप स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहिले. अनेक अधिकाऱ्यांना या वेळी अक्षरशः घाम फुटला होता. डॉ. सुजित गुंजाळ, ललित दरेकर, शिवा सुरासे, प्रवीण कदम, रवींद्र होळकर, प्रमोद पवार, किरण दरेकर, विकास रायते, विक्रम शिंदे, धनंजय डुंबरे, तुकाराम गांगुर्डे, प्रसाद फफाळे यांसह सकल मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.

Chhagan Bhujbal
Maratha Reservation: आम्ही कुणबी, भुजबळांना सांगा आमच्या बांधावर येता कशाला?

भुजबळ रवाना झाल्यानंतर या आंदोलकांनी प्रचंड घोषणा देत कडूलिंबाची़ डहाळी आणि गोमूत्र शिंपडून रस्ता शुचिर्भूत केला. या वेळी आंदोलकांनी भुजबळ यांनी गरिबांच्या आरक्षणाला विरोध करून राजकीय फायद्याचा विचार केला असेल, तर तो त्यांच्या अंगलट येईल, असा इशारा दिला. मतदारसंघात भुजबळ यांच्यासोबत कोणीही राहिलेले नाही. कारण येवला मतदारसंघात सर्व जाती, धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. कोणाचाही कोणाला विरोध नाही, असे डॉ. गुंजाळ यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

Chhagan Bhujbal
Maratha Reservation : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यापासून कुठलीच शक्ती रोखू शकत नाही; बच्चू कडूंचा भुजबळांवर निशाणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com