Sujay Vikhe Patil : सुजय विखेंनी राजकीय पुनर्वसनाचा चेंडू फडणवीस अन् बावनकुळेंच्या कोर्टात टोलवला

Former BJP MP Sujay Vikhe Patil political rehabilitation Shirdi : भाजप माजी खासदार सुजय विखे यांनी राजकीय पुनर्वसनाच्या मुद्यावर शिर्डी इथं पुन्हा प्रतिक्रिया दिली.
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics news : भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी त्यांच्या राजकीय पुनर्वसनावर पुन्हा मोठे भाष्य केले आहे.

"माझं पुनर्वसन काय करायंच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ठरवतील. महायुतीच्या सत्काराच्या कार्यक्रमात सर्वच गंभीर बसले होतो. त्यामुळे मी तिथे मार्मिक बोललो आणि बातमी झाली", असे सुजय विखे यांनी म्हटले.

माजी खासदार सुजय विखे शिर्डी (Shirdi) इथं होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजप आमदार तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी अहिल्यानगर शहरात महायुती आमदारांचा सत्कार केला होता. सुजय विखे यांनी या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि शिवाजी कर्डिले यांच्याकडे माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. माझ्या राजकीय पुनर्वसनाची जबाबदारी घ्या. नाहीतर मी नुसता भाषणापुरता मर्यादीत राहील, असे म्हटले होते.

Sujay Vikhe Patil
Nilesh Lanke : शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदाराच्या खांद्यावर भाजपच्या दिग्गज नेत्याचा हात

सभापती राम शिंदे यांनी यावर सुजय विखेंना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला. तर शिवाजी कर्डिले यांनी तुम्ही आमच्यासाठी आजही खासदारच आहात, असे म्हटले होते. राज्यसभेसाठी शुभेच्छा देखील दिल्या होत्या. सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या राजकीय पुनर्वसनावरून भाजपमध्ये आता चर्चेची राळ उडाली आहे.

Sujay Vikhe Patil
Ajit Pawar : 'आता नकोसं झालंय', 1000 कोटींचा निधी दिलाय, नुसते फोटो काढून...'; अजितदादांचा भर स्टेजवर संताप

विखेंचा फडणवीसांवर विश्वास

सुजय विखे यांनी या मुद्यावर पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "माझं पुनर्वसन काय करायचं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ठरवतील. महायुतीच्या सत्काराच्या कार्यक्रमात सगळेच गंभीर बसलेले होते. त्यामुळे मी मार्मिक बोललो आणि बातमी झाली". कार्यक्रम सत्काराचा वाटला पाहिजे, ती काही शोकसभा नव्हती. जनतेची कामे करण्यासाठी सुजय विखेला कुठल्या पदाची गरज नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर माझा पूर्ण विश्वास आहे, असे सुजय विखे यांनी म्हटले.

शिर्डी व्हीआयपी दर्शन

शिर्डीच्या साई मंदिरात व्हीआयपी दर्शनामुळे अनेकदा दर्शन रांगा थांबवल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्य भक्तांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. साईबाबा संस्थानने तिरुपतीच्या धर्तीवर व्हीआयपींना पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंतच दर्शनाची व्यवस्था करता येईल का? याबाबत विचार करावा, अशी मागणी सुजय विखे यांनी केली. व्हीआयपींना ठराविक वेळेतच दर्शन दिल्यास सर्वसामान्यांना दिवसभरात सुकर दर्शन घेता येईल, असं विखे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com