Nilesh Lanke : शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदाराच्या खांद्यावर भाजपच्या दिग्गज नेत्याचा हात

NCP Sharad Pawar MP Nilesh Lanke BJP Minister Nitin Gadkari Delhi Maharashtra : अहिल्यानगरमधील एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी भाजप नेते मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली.
Nilesh Lanke 1
Nilesh Lanke 1Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics 2025 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरमधील खासदार नीलेश लंके दिल्ली वजन वाढवत आहेत. भाजपच्या दिल्लीतील दिग्गज नेत्यांच्या ते चांगलेच संपर्कात आहेत. भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ते चांगलेच संपर्कात आहे.

नितीन गडकरी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी देशभरातल्या मंत्री, खासदार, आमदार आणि नेत्यांमध्ये चढाओढ असते. पण, खासदार लंकेंनी मात्र गडकरी यांनी चांगलेच यात कमालच केली. दिल्लीत काम करताना मंत्री गडकरी यांचा हात थेट खासदार लंकेंच्या खांद्यावर आला आहे. त्यामुळे अहिल्यानगरमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात राजकीय चर्चांना धुमारे फुटले आहेत.

दिल्लीतील निगडीत कामासंदर्भात खासदार लंकेंनी (Nilesh Lanke) कामाचा चांगलाच झपाटा लावला आहे. अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा तसेच रांजणगांव गणपती इथल्या औद्योगिक वसाहतीच्या अनुषंगाने या मार्गावर वाढलेली वाहतूक आणि वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन नगर-पुणे ग्रीनफिल्ड महामार्गासंदर्भात खासदार लंकेंनी केंद्रीय रस्ते वाहतूक अन् महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सरू केला आहे.

Nilesh Lanke 1
Chandrashekhar Bawankule : पवार, ठाकरे अन् काँग्रेसला सत्तेत कधीपर्यंत वाव नसणार; मंत्री बावनकुळेंनी 'साल' सांगितलं

हा महामार्ग केवळ पुणे आणि छत्रपती संभाजीनगरला जोडणारा नसून अहिल्यानगर दक्षिण लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागाच्या दळणवळणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याशी थेट आणि सुलभ संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे गरजेचे असल्याचे खासदार लंके यांनी मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.

Nilesh Lanke 1
Ashish Shelar praises Raj Thackeray : राज ठाकरेंचा 'दानपट्टा' फिरणार? 'मनसे'च्या गुढीपाडवा मेळाव्यापूर्वीच भाजप मंत्री शेलारांनी गोंजारलं

जिल्ह्यातील अनेक भागांतून पुणे आणि छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी मोठा वेळ लागतो. नव्या महामार्गामुळे हा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होईल. त्यामुळे शेतकरी, व्यवसायिक आणि स्थानिक उद्योजक यांना मोठा फायदा होणार असून नवीन गुंतवणुकीसाठी मार्ग मोकळा होणार आहे.

ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्प राबविताना अहिल्यानगर जिल्ह्यातील मुख्य भागांना या महामार्गाशी थेट जोडण्यासाठी स्वतंत्र इंटरचेंज आणि कनेक्टिव्हिटी उपाययोजनांची यावेळी मंत्री गडकरी यांच्याकडे खासदार लंके यांनी मागणी केली. महामार्गामुळे केवळ मोठी शहरेच नव्हे, तर ग्रामीण भागालाही फायदा व्हायला हवा, अशी भूमिका खासदार लंके यांनी मानली. त्यावर मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मागण्यांचा विचार करून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली.

संसदेतही विषय मांडणार

मंत्री नितीन गडकरी व खासदार नीलेश लंके यांची ही भेट केवळ महामार्गाच्या दृष्टीनेच नव्हे तर अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील एकूणच विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरली. खासदार लंके यांनी हा विषय संसदेतही पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार लंके यांच्या भेटींमुळे अहिल्यानगरमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात वेगळीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com