Sujay Vikhe Patil : सुजय विखेंचा काँग्रेसच्या आणखी एका बालेकिल्ल्यावर डोळा? म्हणाले, 'आता मी इथं सातत्यानं येणार!'

BJP Ex MP Sujay Vikhe Patil Bhoomipujan new housing scheme Gharkul Yojana Ahilaynagar Shrirampur Maharashtra : श्रीरामपूर इथं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांच्या बांधकामाचा भूमिपूजन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
Sujay Vikhe Patil 1
Sujay Vikhe Patil 1Sarkarnama
Published on
Updated on

Ahilaynagar Shrirampur housing scheme : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी संगमनेर दौरे वाढवले होते. तिथं सत्तांतर घडलं. बाळासाहेब थोरातांनी गेली 40 वर्षे एकहाती राखलेला काँग्रेसचे बुरूज ढासळला. आता सुजय विखे यांनी श्रीरामपूरमध्ये लक्ष घालवण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे तिथंल्या प्रस्थापित राजकारण्यांमध्ये धडकी भरली.

तसं श्रीरामपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला! सुजय विखेंनी संगमनेरमधील काँग्रेसमधील बुरूज उद्ध्वस्त केला. आमदार हेमंत ओगले काँग्रेसमधून श्रीरामपूरचं नेतृत्व करत आहे. त्यामुळे सुजय विखे यांनी श्रीरामपूरमध्ये लक्ष घालण्याची, सातत्याने तिथं येण्याची केलेली टिप्पणीला राजकीय दृष्ट्या महत्त्व आलं आहे.

भाजप (BJP) सुजय विखे यांनी श्रीरामपूरला आता मी वारंवार भेट देणार आहे. सर्वांनी एकत्र येऊन विकासात्मक दृष्टीने काम करूया, असं मत मांडून विकासाला प्राधान्य देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. श्रीरामपूरमधील वाढती गुन्हेगारी, चेन स्नॅचिंग, खंडणी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर कोणताही समाज असो, गुन्हेगारी प्रवृत्तीला समर्थन देणार नाही. अशांना उखडून फेकलं जाईल. श्रीरामपूरच्या कायदा व सुव्यवस्थेवर कठोर पावले उचलण्याचा इशाराही सुजय विखेंनी दिला.

Sujay Vikhe Patil 1
Ajit Pawar humorous comment : 'काकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याच्याशिवाय...'; अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं 'खसखस पिकली' (VIDEO)

सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी डिजे मुक्त मिरवणुकीसाठी नागरिकांना आवाहन केले. महामानवांच्या जयंतीत डीजे किंवा अनावश्यक खर्च न करता आरोग्य शिबिर, समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले पाहिजे. विचारांशी नातं जोडण्याचा खरा मार्ग तोच आहे. जनतेची कामं करा, जनता आपल्याला नेता बनवते. त्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नसते, असा मार्मिक सल्ला दिला.

Sujay Vikhe Patil 1
Dada Bhuse Politics: शिक्षणमंत्र्याचा अजब सल्ला; विद्यार्थ्यानो, ‘आता शाळेत भाजीपालाही विकायला आणा’

राजकारणाची दिशा ठरवणारे विचार मांडताना, राजकारण छोट्या गोष्टीवर न होता, गरिबांना घर, शेतकऱ्यांना वीज आणि शिक्षण मिळाले पाहिजे. श्रीरामपूर बदलायच असेल तर तुझं-माझं, सोडून जनतेच्या हितासाठी काम करावं लागेल. सत्ता बदलली की काही नेते पक्ष बदलतात. परंतु गोरगरीब जनतेची सेवा केली, तर जनता कधीच विसरत नाही. त्यामुळे जनतेवर विश्वास ठेवावा, पुढाऱ्यांवर नव्हे, असा सल्ला देखील सुजय विखे यांनी दिली.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून श्रीरामपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 600 नवीन घरकुलं मंजूर झाली असून, ही घरं सोलर सिस्टिमसह उभारण्यात येणार आहेत. यामध्ये दत्तनगर हे एकत्रित केंद्र असणार असल्याचे सुजय विखे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com