Political news Maharashtra 2025 : शरद पवार असो की, अजित पवार यांचा कोठेही संदर्भ आला की, काका-पुतण्याचा विषय निघतोच. शरद पवार यांच्यापासून वेगळं होत, राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी चूल अजित पवारांनी मांडली. अजित पवार महायुतीच्या सत्तेत उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत.
महायुतीबरोबर राजकीय वाटचाल सुरू करताना, अजित पवार यांनी शरद पवार यांना बाजूला सारलं आहे. त्यामुळे हे काका-पुतणे एकत्र आले किंवा, एकमेकांविषयी टिप्पणी केली तरी त्याचे पडसाद राज्यासह देशाच्या राजकारणात उमटतात. तशीच काहीशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी बारामतीमधील बोरकरवाडी इथल्या कार्यक्रमात केल्याने पवार काका-पुतण्याची राजकीय केमिस्ट्रीवर चर्चा सुरू झाली. तसंच उपस्थितींमध्ये खसकस पिकली.
बोरकरवाडीमधील रस्त्यांविषयी बोलताना अजित पवार यांनी बीडीओ, तहसीलदार, पोलिस निरीक्षकांना सांगितलं आहे. काका कुतवळ यांना देखील सहकार्य करण्याचे सांगितलं आहे. कारण, काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याच्याशिवाय पुढं चालतं नाही, असे म्हणताच खसखस पिकली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर लगेचच, मी काका कुतवळांना म्हटलो, नाहीतर लगेच दादा घसरले, पण मी कोणावरही घसरलो नाही, असेही म्हणत बाजू सावरली.
अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या विकास कामांच्या प्रयत्नावर यावेळी भाष्य केले. पवार साहेब यांच्यासह अनेकांनी त्यांच्या काळात विकास करण्याचा प्रयत्न केला, असे सांगून पाण्याशिवाय काहीही होऊ शकत नाही, यासाठी आम्ही जनाई-शिरसाई योजना सुरू केल्याचे सांगितले.
'1991 साली पिंपरी चिंचवडची लोकसंख्या सहा लाख होती, 2041 मध्ये ती 61 लाख होईल. योजना करणं आमचं काम आहे. परंतु त्याचा मेंटेनन्स करणं हे तुमचं काम आहे, ते व्यवस्थित झालं पाहिजे. मी अधिकाऱ्यांना इथं घेऊन आलो आहे, मला काही गोष्टी कळतात, तिथे मुंबईला जर कुठला अधिकारी काय म्हटला, तर मला सांगता येतं की मी तिथे जाऊन आलोय, तुम्ही एसीमध्ये बसून सांगू नका', अशीही अधिकाऱ्यांची कान टोचणी अजितदादांनी केली.
'आधी या भागात कुणालाच पाणी मिळत नव्हतं. तुम्ही त्यावेळेस म्हणालात की आम्ही जमिनी देतो. आम्हाला पैसे नको. फक्त आम्हाला पाणी द्या. परंतु आता तुम्ही पैसे मागायला लागलेला आहात. आम्ही बंद पाईपद्वारे पाईपलाईन करणार आहोत. त्याच्यामुळे खाली जमिनीच्या तीन ते फूट पाईप टाकणार आहोत. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही शेती करू शकता', असाही सल्ला अजित पवारांनी दिला.
'पहिल्यांदा कृष्णा खोरे महामंडळाचा मंत्री झालो. त्यावेळेस पुरंदर उपसा योजना केली आहे. पुरंदर योजनेचे पाणी आपल्याला 12 महिने मिळणार आहे. पाच वर्षाला आमदाराला 25 कोटी मिळतात. मी 100 दिवसात दीड हजार कोटी आणलेत, कशाला म्हणतात', असेही अजित पवार यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.