Shirdi Double Murder : शिर्डीतील हल्ल्याला पोलिस अपघात सांगायचे, 'त्या' तक्रारीची दखल घेतली नाही; पोलिसांच्या हलगर्जीपणावर संताप

BJP Sujay Vikhe SP Rakesh Ola accident Shirdi police knife attack : शिर्डीतील दोघांचा खून करणाऱ्याला संशियत हल्लेखोराला पोलिसांनी पकडले असून, त्याचा साथीदार पसार आहे.
Shirdi
ShirdiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या खुनात एकाला संशयिताला ताब्यात घेण्यात आलं. त्याचा आणखी एक साथीदार पसार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. या हल्ल्यानंतर शिर्डी पोलिसांच्या कार्यपद्धतीतील अनेक उणिवा समोर येऊ लागल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी संशियत आरोपीने एका महिलेला मारहाण केली होती. त्यावेळी महिलेची तक्रार घेतली नाही. आज पहाटे साडेपाच वाजता हल्ल्याची माहिती दिल्यानंतर शिर्डी पोलिस अपघात असल्याचे सांगत होते. यामुळे शिर्डीकरांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीवरून संतापाची लाट उसळली आहे.

शिर्डीत (Shirdi) आज पहाटे वेगवेगळ्या तीन ठिकाणी चाकू हल्लेखोरांनी हल्ले करून लुटीचा प्रकार केला. सुभाष साहेबराव घोडे यांच्यावर कर्डोबा नगर चौकात हल्ला झाला. तर नितीन कृष्णा शेजुळ यांच्यावर साकुरी शिव येथे हल्ला झाला. यामध्ये श्रीसाईबाबा संस्थानमधील कर्मचारी सुभाष घोडे आणि नितीन शेजुळ या दोघांचा मृत्यू झाला आहे. कृष्णा देहरकर (रा.श्रीकृष्णानगर) हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Shirdi
Shirdi Double Murder : मर्डर करणारे कोण? सुजय विखे म्हणाले, 'मोफत अन्नछत्र, मोफत शिर्डी करून ठेवलीय...' (पाहा VIDEO)

या हल्ल्यामध्ये पोलिसांनी (Police) एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून चाकू आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तसंचे हल्लेखोराचा दुसरा साथीदार हा त्याचा मेव्हणा असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. दरम्यान, या हल्लेखोरांविषयी आता वेगवेगळी माहिती समोर येत आहे. हे हल्लेखोर तीन दिवसांपासून शिर्डीत धुमाकूळ घालत असून, दोन दिवसांपूर्वी एका महिलेला मारहाण केली.

Shirdi
Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादग्रस्त निर्णय; 'इनसाइट'चा राजकीय दबाव?

मारहाण झालेल्या महिलेच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्याचवेळी दखल घेतली असती, अन् गुन्हा नोंदवून घेतला असता, तर घोडे आणि शेजुळ यांचा आज जीव वाचला असता, अशी चर्चा आहे. माजी खासदार सुजय विखे यांनी याबाबत पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचे लक्ष वेधताना, त्यावेळी गुन्हा दाखल का केला नाही? असा प्रश्न केला आहे.

याशिवाय हल्लेखोरांनी पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले केलेत. त्याची माहिती पोलिसांना पहाटे साडेपाच वाजता देण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी अपघात झाल्याचे सांगत होते. एकप्रकारने पोलिसांनी या घटनेत हलगर्जीपणा दाखवला आहे. हा प्रकार देखील पोलिस अधीक्षकांच्या लक्षात आणू दिला असून, संबंधित पोलिसांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत त्यावर कारवाई करा, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे यांनी केली आहे.

प्रोटोकाॅलसाठी स्वतंत्र पोलिस निरीक्षक

शिर्डीत अनेक मंत्री, व्हीआयपी श्रीसाईबाबा समाधी दर्शनासाठी येत असतात. या व्हीआयपींच्या बंदोबस्तासाठी पोलिस यंत्रणा गुंतते. यावर उपाययोजना म्हणून प्रोटोकाॅलसाठी स्वतंत्र पोलिस निरीक्षक देण्याचा निर्णय झाला आहे. शिर्डीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर यापुढं कोणताही प्रोटोकाॅलचा ताण नसेल, यासाठी पोलिस अधीक्षकांची चर्चा झाल्याचे माजी खासदार सुजय विखे यांनी सांगितले. दरम्यान, शिर्डीत साईभक्तांना सोडून इतर कोणालाही मोफत जेवण दिलं जाणार नाही, याचा पुनरुच्चार सुजय विखेंनी केला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com