BJP on Loksabha Election : दहा लाख बचत गट देणार भाजपला निवडणुकीत बळ?

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप दहा लाख बचत गटांना पक्षाशी जोडणार
Varsha Bhosale
Varsha BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची यंत्रणा चांगलीच सक्रिय झाली आहे. आता त्यांनी राज्यात महिला कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन दहा लाख बचत गटांना पक्षाशी जोडण्याचा निर्धार केला आहे.

भाजपने काल राज्यभरात महिला मोर्चातर्फे कार्यकर्त्यांसाठी 'शक्तिवंदन' कार्यशाळा सुरू केल्या आहेत. नाशिकला प्रदेश उपाध्यक्षा वर्षा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात उत्तर महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघातील 350 पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती भोसले म्हणाल्या, आगामी काळात पक्षाने महिलावर्गावर विशेष भर दिला आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला महिलांना भाजपशी जोडायचे आहे. यात यशस्वी झाल्यास पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळेल. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी याबाबत सक्रिय होऊन काम केले पाहिजे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Varsha Bhosale
Manoj Jarange March to Mumbai : सरकारच्या दारात मरण आले तरी बेहत्तर; आजपासूनच उपोषणाची मनोज जरांगेंची घोषणा

'महाराष्ट्रातील दहा लाख बचत गट पक्षाशी जोडून त्यातील महिला सदस्यांना गतिमान करण्याचा उद्देश शक्तिवंदन या उपक्रमाचा आहे,' असे श्रीमती भोसले म्हणाल्या. दहा लाख बचत गटांमध्ये किमान आठ ते दहा सदस्य असल्याने भाजप या माध्यमातून एक कोटी महिलांना जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांत पक्षाने असंख्य उपक्रम सुरू केले आहेत, त्याला किती यश मिळेल हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, यानिमित्ताने अनेक घटकांना जोडण्याची धडपड करीत असलेल्या भाजपने आता महिलांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे हे स्पष्ट होते.

या विभागीय मेळाव्यास नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर व जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या 13 संघटनात्मक आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांवर बचत गट जोडण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आमदार सीमा हिरे, अश्विनी बोरस्ते, रोहिणी नायडू, सोनाली ठाकरे, सोनाली राजे, रश्मी हिरे, उमा पवार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

R...

Varsha Bhosale
Dhule Lok Sabha Constituency : डॉ.सुभाष भामरेंच्या मार्गात वय, पक्षांतर्गत स्पर्धकांचा अडसर...!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com