`वाइन`च्या आडून भाजपने शेतकऱ्यांचा अपमान केला!

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शासनाच्या वाइन धोरणाचे समर्थन
NCP womens wing in Support of State Government
NCP womens wing in Support of State GovernmentSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) घेतलेल्या कोणत्याही निर्णयास भाजपाचा (BJP) जाणूनबुजून विरोध असतो. वाइन (Wine) विक्रीच्या निर्णयाबाबत तर त्यांनी कहर केला आहे. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळणार असतील तर यांच्या पोटात का दुखते. भाजपने वाइन प्रश्नावरील आंदोलनातून राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. उत्तर प्रदेशातही वाइन विक्री होते ती भाजपला कशी चालते, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महिला आघाडीच्या अनिता भामरे यांनी केली आहे.

NCP womens wing in Support of State Government
कुलसचिव व मुलाची हत्या करून ९६ लाखांचे शेअर विकले

यासंदर्भात राज्य शासनाने वाइन विक्री संदर्भात घेतलेल्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब, राज्य महिला आयोगअध्यक्ष रूपाली ताई चाकणकर यांना अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी समर्थन देत या आशयाची पत्रे स्वहस्ताक्षरात लिहून पाठवली आहेत.

NCP womens wing in Support of State Government
गृहमंत्र्यांची पोलिसांना शाबासकी; ६० दिवसांत बलात्काऱ्याला शिक्षा!

महाविकास आघाडी सरकारने राज्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी तसेच शेतकऱ्यांना द्राक्ष उत्पादनातून दोन पैसे कमाई व्हावी या हेतूने सुपर मार्केट मध्ये वाइन विक्रीस परवानगीचा विचार केला आहे. यासाठी काही अटी देखील घातल्या आहेत. प्रत्येक किराणा दुकानात वाइन विक्री करता येणार नाही. किमान एक हजार स्क्वेअर फूट व कमीत कमी दहा कामगार असलेल्या सुपर मार्केट दुकानास वाइन विक्रीची परवानगी मिळेल. तसेच दुकानात वाइन विक्रीसाठी विशिष्ट रॅकचे मोजमाप बंधनकारक राहील. वाइन विक्रीचा चा निर्णय हा ऐच्छिक असेल. ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणाऱ्या दुकानासच परवानगी मिळणार आहे.

शेतकऱ्याने शेतात पिकवलेल्या द्राक्षांपासून वाइन बनते हे प्रत्येकाला माहीत असून देखील शेतकर्‍याच्या खिशात दोन पैसे मिळू नयेत अशी भाजपची शेतकरी विरोधी भूमिका दिसते. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय आधीच संकटात सापडला आहे अशा संकटसमयी वाइन विक्रीतून शेतकऱ्याला दोन पैसे हक्काचे मिळतील या हेतूनेच सरकारने निर्णय घेतला होता मात्र भाजपने यात मिठाचा खडा घातलाच. आजमितीस देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेशात वाइन विक्रीस किराणा दुकानात परवानगी आहे तेथे भाजप विरोध करीत नाही कारण तिथे भाजपचे सरकार आहे परंतू महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही म्हणून केवळ सूड भावनेतून भाजप विरोध करतांना दिसतो.

वाइन आणि लिकर यात काय फरक आहे हे पहिले नासिक मधील भाजपच्या महिला आंदोलकांनी समजून घ्यावे. किराणा दुकानात वाइन विक्रीस ठेवली म्हणजे प्रत्येक ग्राहक विकत घेईलच असे कदापी शक्य नाही त्यासाठी खिशात पैसे हवेत. पैसे नसतील तर किराणा दुकानातील शरीराला पोषक असलेले काजू बदाम सुध्दा ग्राहक विकत घेऊ शकत नाही हे पहिले लक्षात घ्या. महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे याची कल्पना सरकारला असून सुसंस्कृतीचा ठेका फक्त भाजपचा नाही. विरोधाला विरोध म्हणून सरकारच्या विरोधात भर रस्त्यात थयथयाट नको. यापुढील काळात भाजपने सुपर मार्केट मध्ये वाइन विक्रीस विरोध केल्यास द्राक्ष पिकविणार्या महिला शेतकऱ्यांनी पुढे येत सरकारला समर्थन द्यावे अशी इच्छा राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी व्यक्त केली.

यावेळी पंचवटी विभाग अध्यक्ष सरिता पगारे, पश्चिम विभाग अध्यक्ष योगिता आहेर, पूर्व विभाग अध्यक्ष सलमा शेख, नासिक रोड विभाग अध्यक्ष रूपाली पठारे, शहर महिला पदाधिकारी डॅा मृगाक्षी क्षीरसागर, मिनाक्षी गायकवाड, संगिता अहिरे, लता नागरे, स्मिता चौधरी, संगिता सानप, रूपाली अहिरे, संगिता घाडगे, मिनाक्षी जाधव, मंगला डोईफोडे, चैताली आहेर, विजया जाधव, वैशाली टोचे आदी उपस्थित होत्या.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com