गृहमंत्र्यांची पोलिसांना शाबासकी; ६० दिवसांत बलात्काऱ्याला शिक्षा!

फास्ट ट्रॅक सुनावणी : सतरा दिवसांत तपास; साठ दिवसांत खटल्याचा निकाल
Rape case investigation Team
Rape case investigation TeamSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : बिस्कीटाचे आमिष देत चारवर्षीय चिमुरडीवर अत्याचार (Child abuse case) करणाऱ्या नराधमाविरुद्ध अवघ्या १७ दिवसांत तपास पूर्ण करण्यात आला. न्यायालयात (Court) दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याचे कामकाज ६० दिवसांत पूर्ण होत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अतिशय जलदगतीने तपास व शिक्षा झालेल्या या प्रकरणात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-patil) यांनी तपास करणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन केले.

Rape case investigation Team
कुलसचिव व मुलाची हत्या करून ९६ लाखांचे शेअर विकले

या कारवाईसाठी तपास करणाऱ्या पोलिस पथकाबाबत गृहमंत्र्यांनी या कारवाईसाठी समाधान व्यक्त केले. या खटल्यात न्या. एस. एन. माने-गाडेकर यांनी आरोपी सावळाराम भानुदास शिंदे यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पीडितेला मनोधैर्य योजनेंतर्गत तीन लाख, दंडाची निम्मी रक्कम, विक्टिम कॅम्पेन्सेशन फंडांतर्गत दहा लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश दिले. त्यामुळे या कारवाईविषयी नागरिकांत देखील समाधान आहे.

Rape case investigation Team
भाजप नगरसेविका म्हणते, निवडणूक लढेन... पण दुश्मनी करणार नाही!

चाळीसगाव तालुक्यातील चारवर्षीय चिमुरडीला २७ नोव्हेंबर २०२१ ला रात्री नऊच्या सुमारास सावळाराम भानुदास शिंदे (वय २७, रा. मानसिंगका कॉलनी, पाचोरा, मूळ गाव लढरे, ता. नांदगाव, जि. नाशिक) याने बिस्किटाचा पुडा खायला देतो, असे सांगून उचलून नेत अत्याचार केला होता. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. चाळीसगाव पेालिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल टकले यांनी प्राथमिक तपासाला सुरवात केली. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावंडे यांनी पूर्ण केला.

तपासात संशयितासह पीडितेच्या अंगावरील कपडे, रक्ताचे नमुने, डीएनए तसेच शरीरावरील ओरखडे आदींसह विविध पुरावे संकलित करून त्यांचे शासकीय प्रयोगशाळेतून पृथक्करण अहवाल प्राप्त करून अवघ्या १७ दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. खटल्याचे कामकाज विशेष न्यायालयात न्या. श्रीमती एस. एन. माने-गाडेकर यांच्या न्यायालयात सुरू होते.

खटला फास्ट ट्रॅक

विशेष न्यायालयाने हा खटला जलदगतीने चालवून साठ दिवसांत सुनावणी पूर्ण करून बुधवारी (ता. १६) निकाल दिला. न्यायालयाने आरोपी सावळाराम शिंदे यास आजन्म कारावास व दोन लाख आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली.

न्यायासाठी झटणाऱ्यांचा सन्मान

गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी कैलास गावडे, सहाय्यक निरीक्षक विशाल टकले, पोलिस नाईक राकेश पाटील, राहुल सोनवणे, विमल सानप, सबा शेख यांच्या पथकाने पूर्ण केला. खटल्याच्या कामकाजात निरीक्षक के. के. पाटील यांच्या पथकातील दिलीप सत्रे यांच्यासह जिल्‍हा सरकारी अभियोक्ता ॲड. केतन ढाके अशांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सत्कार करून अभिनंदन केले..

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com