भाजप कट, कॅापी करण्यात खुप माहीर आहे!

चीनचा विमानत, बंगालचा उड्डानपूल भाजप उत्तर प्रदेशात दाखवू शकतो.
MLA Rohit Pawar
MLA Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आम्ही विधीमंडळात सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आलो आहोत. मात्र इथे कुठे तरी राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजप (BJP) कट, कॅापी करण्यात खुप माहीर आहे, हे नव्याने सांगण्याची जरूरी नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी सांगितले.

MLA Rohit Pawar
अवकाळीग्रस्तांसाठी आमदार कुणाल पाटील विधानसभेत अन् पत्नी थेट बांधावर!

विधीमंडळाच्या दालनात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, काल विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांचे जे भाषण झाले. त्यात त्यांनी कागदपत्र दाखवले. त्याबरोबरच त्यांनी विधानसभा अध्यक्षांना एक पेनड्राईव्ह दिला. खरे तर अध्यक्षांना पेन ड्राईव्ह दिल्यानंतर आमची अशी अपेक्षा होती की, त्याचे फॅारेन्सिक अॅाडीट होऊन त्यात खरे खोटे काय आहे, त्याची खातरजमा करण्याची संधी दिली जाणार. मात्र अध्यक्षांना दिल्या दिल्याच लगेचच तो पेन ड्राईव्ह माध्यमांनाही दिला. त्यामुळे त्याचे काही राजकारण केले की काय, असे आमच्या व सामान्यांच्या मनात येते.

MLA Rohit Pawar
मालेगावला काँग्रेसने जे भरभरून दिलं, ते पक्षांना जमलेलं नाही!

ते पुढे म्हणाले, एक गोष्ट आपण समजुन घेतली पाहिजे की, जोपर्यंत फॅारोन्सिक अॅाडीट होत नाही तोपर्यंत तो व्हीडीओ खरा की खोटा कळत नाही. त्यामुळे कुठल्याही स्थितीत निर्णयाप्रत येणे हे बरोबर नाही, असे माझ्यासारख्याला आणि लोकांना देखील वाटते.

तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करायचा झाला, तर तुम्ही सर्वांनी पेगॅसेस विषयी ऐकले असेल. ईस्त्राइलकडे हे तंत्रज्ञान आहे. त्या तंत्रज्ञानात तुमच्या हातातील मोबाईल सुरु करु शकतो, बंद करु शकतो, त्यातील अॅाडीओ, व्हीडीओ सर्व सुरु करू शकतो. हे तंत्रज्ञान फार कमी देशांकडे आहे. भारतात ते तंत्रज्ञान आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. संसदेत त्याची चर्चा झाली आहे. सध्या तो विषय न्यायप्रविष्ठ देखील आहे.

एआय व्हीडीओ टूल हे देखील एक तंत्रज्ञान आहे. कोणीही गुगल सर्च इंजिनवर गेल्यास त्याची माहिती मिळेल. इबीसी न्यूजचा हा एक व्हीडीओ आहे, त्यात त्याची माहिती आहे. यामध्ये एखाद्या नेत्याचे जे ओठ असतात, त्यात लीपसींग केले जाते. एखाद्या व्यक्तीचा चेहरा घेतला जातो व जे ओठ असतात, ते दुसरे असतात. त्याचा वापर तेथे केला जातो. त्यातून ती व्यक्तीच बोलतो की काय, असा संभ्रम निर्माण केला जातो. मात्र ते खरे नसते. तसा वापर झालाय असे मी म्हणनार नाही, मात्र तसे होऊ शकते. पेगॅसेस टूल आहे, भाजपच्या काळात देशात आले आहे. त्यामुळे कोणालाही शंका येऊ शकते. त्यासाठी फडणवीस यांन दिलेल्या व्हीडीओचे फॅारेन्सिक अॅाडीट करण्याची गरज आहे.

आमदार पवार म्हणाले, आम्ही विधीमंडळात सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आलो आहोत. मात्र इथे कुठे तरी त्यात राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असे आमच्यासारख्यांचे मत आहे. भाजप कट, कॅापी करण्यात खुप माहीर आहे. चीनचे एक विमानतळ उत्तर प्रदेशात झाला म्हणून ते दाखवू शकतात. पश्चिम बंगालचा एक उड्डानपूल उत्तर प्रदेशात दाखवला. तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आम्ही कमी पडतो.तंत्रज्ञानाचा वापर करण्यात ते फार पुढे आहेत.

अधिकाऱ्याच्या खोलीत कॅमेरा ठेवला जातो. तो व्हीडीओ फक्त भाजापकडे असतो. त्यामुळे त्याला स्टींग अॅापरेशन म्हणता येणार नाही. फॅारेन्सिक अॅाडीटचा अहवाल आल्याशिवाय त्याला काहीच आधार नाही. आमच्यासारखे तरुण तरी विधानसभेत सामान्यांचे प्रश्न मांडायला आलो आहेत. ते सध्या होत नाही, याचीच मला खंत वाटते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com