मालेगाव : काँग्रेस (Congress) हा विचार प्रवाह आहे. तो अखंडित प्रवाहित राहणार आहे. या प्रवाहात सहभागी होऊन राष्ट्र आणि लोककल्याणासाठी समर्पण भावनेतून काम करा. पक्ष संघटन बळकट करा. आगामी महापालिका (Malegaon) व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतभेद विसरून एकत्र या, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार मुझफ्फर हुसेन (Mujjafar hussain) यांनी येथे केले.
मालेगाव महानगर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, मालेगाव महानगर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रसाद हिरे, शहर प्रभारी तारिक फारुकी, शरद आहेर, रमेश कहांडोळे, ज्ञानेश्वर गायकवाड, डॉ. मंजूर हसन अयुब्बी, नगरसेवक एजाज बेग, डॉ. शकिला सय्यद, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिता अवस्थी, रशीदा मंजूर खान आदी व्यासपीठावर होते.
काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. पक्षसंघटन बळकट करण्यावर भर द्या. लोकहिताच्या कामांना प्राधान्य द्या. त्यातूनच आपण नवी उभारी घेऊ. मालेगाव शहराच्या विकासासाठी काँग्रेसने जे भरभरून दिलं, ते इतर कोणत्याही पक्षाने दिलेलं नाही. लोकांना याची जाण आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकजुटीने मैदानात उतरा. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्षपद सर्वसंमतीने लवकरच निश्चित केले जाईल. प्रत्येक कार्यकर्त्याने निष्ठेने काम केल्यास यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास श्री. हुसेन यांनी व्यक्त केला.
श्री. हिरे यांनी जुन्या-नव्या कार्यकर्त्यांच्या समन्वयातून, एकजुटीतून पक्षसंघटन बळकट करण्यासाठी सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले. या वेळी पक्षाचे प्रभारी तारिक फारुकी, शरद आहेर, डॉ. मंजूर हसन अयुब्बी, माजी नगरसेवक मंजूर खान, जैनू पठाण, जमील क्रांती, नगरसेवक एजाज बेग आदींनी मनोगत व्यक्त केले. गुफरान मास्टर, इशतेशाम अन्सारी, फारुख फिरदोशी, शकील खलिफा, फारुक सुलेमान, सैद मौलाना, राजू पठाण, हसन बॉस, इरफान, अब्दुल रशीद, अशपाक, इस्माईल जुम्मन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, साहिल अन्सारी, गफ्फर शेख, माधव नागपुरे, सावळीराम अहिरे, पद्माकर पाटील, बाजीराव निकम, रामराव शेवाळे, रमेश बच्छाव, वाय. के. खैरनार, कैलास भोई, पप्पू खैरनार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आझिम अन्सारी यांच्यासह समाजवादी पार्टीतून काँग्रेस पक्षात शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. या वेळी या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
-----------
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.