Nagpur : दंगलखोरांना कोर्टाचा दणका; मध्यरात्री 3 वाजेपर्यंत सुनावणी घेत केले पोलिसांच्या हवाली!

Nagpur riots news : नागपूर दंगलीमध्ये गुन्हे दाखल झालेल्या संशयित आरोपींना प्रथम वर्ग न्यायालयाने चांगलाच दणका दिला. पहाटे तीनवाजेपर्यंत सुनावणी घेत न्यायालयाने तब्बल 23 जणांना पोलीस कोठडी सुनावली.
Nagpur Violence
Nagpur ViolenceSarkarnama
Published on
Updated on

Nagpur riots news : नागपूर दंगलीमध्ये गुन्हे दाखल झालेल्या संशयित आरोपींना प्रथम वर्ग न्यायालयाने चांगलाच दणका दिला. पहाटे तीनवाजेपर्यंत सुनावणी घेत न्यायालयाने तब्बल 23 जणांना पोलीस कोठडी सुनावली. तर चार जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सुलताना मैमुना यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडली. पण यानिमित्ताने नागपूरच्या न्यायपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री तब्बल 3 वाजेपर्यंत सुनावणी घेण्यात आली.

औरंगजेबाची कबरी हटविण्यावरून उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी तब्बल 51 जणांना ताब्यात घेतले आहे. यातील 27 संशयितांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. या संदर्भात न्यायालयात पहाटे तीनवाजेपर्यंत सुनावणी चालली. संपूर्ण शहर झोपी गेले असताना न्यायालयात दोन पक्ष बाजू मांडत होते.

Nagpur Violence
Nagpur Violence : संतापजनक! नागपूर हिंसाचारात महिला पोलिसाचा विनयभंग? शिवीगाळ, अश्लील शेरेबाजी अन् वर्दीवर हातही टाकला

सुनावणीवेळी बचाव पक्षातर्फे वकील मोहम्मद शारीक व इतर वकिलांनी बाजू मांडली. यावेळी आरोप केला की, अनेकांचा या घटनेशी काहीही संबंध नाही. भालदारपुरा परिसरातील स्थानिक नव्हे, तर बाहेरच्या व्यक्तींनी हिंसाचार घडवला. पण त्यानंतही पोलिसांनी यातील काहींना अत्यंत कठोरपणे मारहाण केली, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत, असाही आरोप बचाव पक्षाने केला.

सरकारी वकील मेघा बुरंगे यांनी बचाव पक्षाचे हे आरोप फेटाळून लावत आरोपींना पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे ठामपणे सांगितले. अखेर न्यायालयाने 4 संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली, तर उर्वरित आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी सुनावणीवेळी कडक बंदोबस्त तैनात केला होता.

Nagpur Violence
Nagpur Riots : औरंगजेबच्या कबरीचे काय करायचे? ते देवाभाऊंनी ठरवावे! शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा टोला

नागपूरमध्ये काय घडले?

सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले होते. मात्र, या आंदोलनानंतर एक अफवा पसरली आणि रात्री आठ वाजताच्या सुमारे शहरात पडसाद उमटले. अचानक एक जत्था हिंदू-मुस्लिम बहूल हंसापुरी परिसरात धावून आला. त्यांनी तुफान दगडफेक केली, तोडफोड केली. रात्री बारावाजेपर्यंत हा प्रकार सुरू असल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती.

या घटनेत पोलिसांवरही दगडफेक झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या घटनेत 34 पोलीस जखमी झाले. 5 नागरिकांना जबर मार लागला आणि 45 वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर काही वाहनेही जाळ्यात आली. याच घटनेत एका डीसीपींवर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत 50 हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com