Chitra Wagh; चित्रा वाघ आल्या, पण तब्बल दोन तास उशीरा!

नाशिक शहरात अजित पवार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपची घोषणाबाजी
Chitra Wagh in BJP agitation in Nashik
Chitra Wagh in BJP agitation in NashikSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : विरोधी पक्षनेते (NCP) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना पुढे सरसावली. ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली. नाशिकमध्ये (Nashik) आंदोलने सकाळी अकरापासून सुरू झाली. मुंबई नाका येथे भाजपच्या महिला आघाडीतर्फे निदर्शने होणार असल्याने पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. दोन तास ताटकळूनही आंदोलन सुरू होत नव्हते; हे सर्व महिला आघाडीप्रमुख चित्रा वाघ (Chitra Wagh) यांची वाट पाहत होते. (Bjp agitaion against NCP leader Ajit Pawar in Nashik)

Chitra Wagh in BJP agitation in Nashik
Bhagyashree Banait; मुंडेंच्या बदलीचा रेकॉर्ड मोडत बानाईत महापालिकेत रुजू

सुमारे दोन तास ही गर्दी थांबलेली होती. पोलिसांचा फौजफाटा तेवढाच होता. पोलिस महिलापण मोठ्या प्रमाणावर होत्या. भाजपच्या पदाधिकारी महिला दोन तास ताटकळत हातात निषेधाचे फलक घेऊन वाट पाहत उभ्या होत्या. तब्बल दोन तासांनंतर चित्रा वाघ आल्या आणि त्या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या. तेवढ्यात एक ताटकळत उभी असलेली महिला पोलिस कर्मचारी म्हणाली, ‘बाई आल्या; पण अगदी जोरातच आल्या’ आणि मग आंदोलनास व घोषणाबाजीला सुरवात झाली.

Chitra Wagh in BJP agitation in Nashik
Dhule News; भाजप नेत्यांनी अजित पवार यांचा कडेलोट केला

राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत भाजपतर्फे रविवार कारंजा येथे सोमवारी पवार यांच्या विधानाचा निषेध करताना प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

भाजप महिला अध्यक्ष चित्रा वाघ, आमदार प्रा. देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, ज्येष्ठ नेते विजय साने, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, काशिनाथ शिलेदार, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, महिला मोर्चा अध्यक्षा हिमगौरी आडके, सुनील देसाई, भास्कर घोडेकर, देवदत्त जोशी, ॲड. अजिंक्य साने, स्वाती भामरे, प्रतीक शुक्ल, योगेश हिरे, प्रा. कुणाल वाघ, तुषार भोसले, सुजाता करजगीकर, रोहिणी नायडू, नंदकुमार देसाई, महेश सदावर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार कारंजा भागात हे आंदोलन करण्यात आले.

या वेळी अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीदेखील या वेळी आंदोलकांकडून करण्यात आली. अजित पवार यांनी विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने वक्तव्य केले, या वक्तव्याचा निषेध करतो. संभाजीराजे हे धर्मवीरच होते. त्यांनी हिंदू समाजाच्या हितासाठी त्यांनी काम केले. त्यांच्या डोळ्यांमध्ये गरम सळ्या घातल्या गेल्या. परंतु तरीदेखील त्यांनी इस्लाम धर्माचा हा स्वीकार केला नाही, असे आमदार फरांदे या वेळी म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com