नाशिक : (Nashik) छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या विषयीच्या वक्तव्यावरून वातावरण तापले असताना भाजपच्या (BJP) महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजीनगर असे करावे अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संभाजी महाराज धर्मवीर नाहीत असे केलेले वक्तव्य दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. (Ajit Pawar`s statement on Chhatrapati is not expectable)
राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून मुंबई नाका येथे भाजप महिला आघाडीतर्फे आज आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, वादग्रस्त विधाने करून वातावरणात तणाव निर्माण करण्याचे काम केले जात आहे. राहुल गांधी यांनी सुद्धा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा एका रॅलीच्या माध्यमातून अवमान केला. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्माच्या संरक्षणासाठी खूप काही केले आहे. असे असताना ते धर्मवीर नाहीत, असे अजित पवार यांच्यासारख्या प्रगल्भ नेत्याने वक्तव्य करणे योग्य नाही.
औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे होणारच आहे. शिंदे-फडणवीस सरकार यांच्याकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा होईलच. परंतु औरंगाबादचे नाव आता फक्त छत्रपती संभाजीनगर असे करू नका तर धर्मवीर संभाजीनगर करा अशी आपली मागणी राहील असे सौ वाघ म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.