Girish Mahajan: गिरीश महाजन यांनी पदाधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती; पुन्हा चूक केल्यास...

Girish Mahajan angry ON Jalgaon BJP official:जळगाव लोकसभा निवडणुकीत पाहिजे त्या प्रमाणात लीड न मिळाल्याने जळगावाच्या भाजप कार्यालयात बैठक घेतली. प्रत्येक विधानसभेत भाजपला किती मते मिळाली, याचा आढावा महाजन यांनी घेतला.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News: जळगाव लोकसभेत स्मिता वाघ (Smita Wagh)यांना अपेक्षेपेक्षा कमी लीड मिळाल्याने मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची झाडाझडती घेतली.

स्मिताताईंच्या लीडमध्ये आणखी वाढ झाली असती, मात्र अनेकांनी मनापासून काम केले नाही, असे सांगत महाजन यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची कान उघाडणी केली.

जळगाव लोकसभा निवडणुकीत पाहिजे त्या प्रमाणात लीड न मिळाल्याने जळगावाच्या भाजप कार्यालयात गिरीश महाजन यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. प्रत्येक विधानसभेत भाजपला किती मते मिळाली, याचा आढावा महाजन यांनी घेतला.

Girish Mahajan
Video Amit Shah: अमित शहांना 'ते' विधान भोवणार; इंडिया आघाडीची 'सेबी'कडे धाव

मताधिक्यामध्ये आणखी वाढ झाली असती मात्र अनेकांनी मनापासून काम न केल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप पदाधिकाऱ्यांवर संतापले. जी. एम.फाउंडेशन या संपर्क कार्यालयात तब्बल एक तास गिरीश महाजन यांची बंददाराआड बैठक झाली. बैठकीला खासदार स्मिता वाघ उपस्थित होत्या. आगामी निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने चूक पुन्हा केल्यास पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवणार असा इशारा महाजन यांनी दिला.

जळगाव लोकसभेच्या स्मिता वाघ यांना एकूण तब्बल तीन ते साडेतीन लाख एवढे मताधिक्य मिळाले असते, अशी अपेक्षा गिरीश महाजन यांना होती, पण त्या त्या बुथवर पाहिजे त्या प्रमाणात मताधिक्य न मिळाल्याने गिरीश महाजन यांनी नगरसेवकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com