BJP Girish Mahajan : बारामती 'जिंकू' म्हणणारे, गिरीश महाजन नाशकात फेल...

Nashik Lok Sabha Election 2024 Result : नाशिक, दिंडोरी, धुळे आणि नंदुरबार या चार मतदारसंघाची जबाबदारी मंत्री महाजन यांच्याकडे देण्यात आली होती. या सर्व मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

Girish Mahajan politics : उत्तर महाराष्ट्रातील नगर वगळता सहा लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे होती. मात्र यातील चार मतदार संघात भाजपचा मानहानीकारक पराभव झाला. 'जबाबदारी दिली तर, बारामती ही जिंकून दाखवीन', असे विधान त्यांनी केले होते. मात्र हेच महाजन फेल गेल्याने त्यांच्या राजकीय करिअरवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेत.

उत्तर महाराष्ट्रातील सर्व आठ लोकसभा मतदार संघात भाजप-शिवसेना युतीचे खासदार होते. यंदाच्या निवडणुकीत यातील नाशिक, दिंडोरी, धुळे आणि नंदुरबार या चार मतदारसंघाची जबाबदारी मंत्री महाजन यांच्याकडे देण्यात आली होती. या सर्व मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे. भाजपचे संकट मोचक, अशी प्रतिमा महाजन यांची तयार करण्यात आली आहे. महाजन देखील कोणत्याही विषयावर विधाने करायला तत्पर असतात. भाजपची कोणतीही अडचण सोडवायला धावून येतात. सत्ता त्यांच्या मागे उभी असते. मात्र यंदा त्यांची संकट मोचक ही प्रतिमा वांध्यात सापडली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार येथील डॉ. गावित आणि धुळ्याचे डॉ. सुभाष भामरे भाजपचे उमेदवार यंदा हॅटट्रिकच्या तयारीत होते. त्यांनी सर्व शक्ती आणि साधने पणाला लावून प्रचार केला. स्वतः गिरीश महाजन (Girish Mahajan) या मतदारसंघात तळ ठोकून होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. नंदुरबार आणि धुळे येथे भाजपचा पराभव झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिंडोरी मतदार संघात भाजपच्या (BJP) केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार उमेदवार होत्या. या मतदारसंघात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ देखील येतो, थोडक्यात हा दोन मंत्र्यांचा मतदारसंघ आहे. भाजपचे आमदार देखील येथे आहेत. मात्र डॉ. पवार सुरुवातीपासून प्रचारात अडचणीत होत्या.

Girish Mahajan
Nashik Lok Sabha Result 2024 : हेमंत गोडसेंना 'धोका', सीएमच्या दीड डझन बॅगाही झाल्या फेल!

मंत्री महाजन आणि भाजपचे असंख्य नेते पदाधिकारी दिंडोरी मतदार संघात आठवडाभर तळ ठोकून होते. त्यांनी महायुतीच्या नेत्यांबरोबरच विरोधी पक्षाच्या नेत्यांवर विविध 'प्रयोग' केले. अनेक यंत्रणा कामाला लावल्या. भरपूर रसद पुरवली. मात्र हे सर्व प्रयोग काहीही लाभ मिळवून देऊ शकले नाही. यातून डॉ. भारती पवार शेवटच्या टप्प्यात स्पर्धेत आल्या. परंतु त्यांचा पराभव टाळता आला नाही.

Girish Mahajan
Bharti Pawar Vs Bhaskar Bhagre: गावित फॅक्टर निकाल फिरवणार: कांदा कुणाला रडवणार भास्कर भगरे की भारती पवारांना...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com