Nashik Lok Sabha Result 2024 : हेमंत गोडसेंना 'धोका', सीएमच्या दीड डझन बॅगाही झाल्या फेल!

CM Eknath Shinde and Hemant Godse : महायुती आणि शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे पराभवाच्या छायेत आहेत.
Hemant Godse
Hemant GodseSarakarnama

Nashik Loksabha Election Result 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे दीड लाखान पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत.

महायुती आणि शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे पराभवाच्या छायेत आहेत. खासदार गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून तर पक्षाच्या अनेक नेत्यांनी जोर लावला होता. तरीही त्यांचा पराभव होताना दिसतो आहे.

गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आठवड्याभरात तीन वेळा नाशिकचा दौरा केला होता. या दौऱ्यावर येताना त्यांनी आपल्या सोबत 19 बॅगा आणल्या होत्या. या बॅगांमध्ये पैसे होते असा आरोप शिवसेना नेते राऊत यांनी केला होता. त्यामुळे निवडणूक निकालाच्या वेळी त्या बॅगांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Hemant Godse
Nashik Lok Sabha 2024 Result : भुजबळ यांनी केला 'गेम'! गोडसेंना बसवले घरी; यंदा वाजेंची दिल्लीवारी ?

मुख्यमंत्र्यांनी आणलेल्या बॅगांबाबत शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाने निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार केली होती. या भरलेल्या बॅगा घेऊन मुख्यमंत्री नाशिकला आले, मात्र त्यांच्या पक्षाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या मतपेट्या काही भरल्या नाहीत. एकंदर मिळालेली मते पाहता गोडसे यांच्या मतपेट्या रिकाम्याच राहिलेल्या दिसतात. या पराभवाचे कवित्व आता आणखी काही दिवस चालणार आहे.

Hemant Godse
Nashik Loksabha : हेमंत गोडसे गारद! राजाभाऊ 'जायंट कीलर'

यंदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक आमदाराला महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच रसद पुरवल्याची चर्चा होती. त्यामुळे शहरातील प्रत्येक आमदार छातीठोकपणे किती आघाडी मिळेल याचे दावे करत होता. नाशिक मध्याच्या एका महिला आमदाराने तर चक्क किती मताधिक्य मिळेल हे लिखित दिले होते अशी चर्चा आहे.

मतदानाच्या आदल्या दिवशी नाशिक शहरात अनेक ठिकाणी रात्रभर लक्ष्मीदर्शनाचे कार्यक्रम सुरू असल्याचेही सांगण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे आपल्या हेलिकॉप्टर मधून बॅगा घेऊन आले. मात्र त्यांच्या या दौऱ्याने खासदार गोडसे यांच्या मतपेट्यांना फायदा झाला नसल्याचे आता दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com