Shivsena on Kirit Somaiya: किरीट सोमय्यांचे खरे चरीत्र समाजापुढे आले!

Shivsena News: भाजप सोमय्यांवर काय कारवाई करणार हे नेत्यांनी जाहीर करावे असे आव्हान शिवसेनेच्या महिलांनी दिले आहे.
Shivsena Agitation in Nashik
Shivsena Agitation in NashikSarkarnama
Published on
Updated on

Shivsena on Kirit Somaiya: सातत्याने विरोधी पक्षांवर खोटे आरोप करून त्यांचे आयुष्य उध्वस्त करणारे, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे खरे स्वरूप आले आहे. त्यामुळे सातत्याने पार्टी वीथ डिफरन्सचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपने त्यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी, असे आव्हान शिवसेनेच्या महिला आघाडीने दिले आहे. (Shivsena criticised, Is this a real face of party with differance)

भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांच्या अश्लील व्हीडीओ क्लीपचे पडसाद गेले दोन दिवस शहरात (Nashik) उमटत आहेत. शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या महिलांनी मंगळवारी सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

Shivsena Agitation in Nashik
Monsoon Assembly Session : सावेडी हत्याकांडावर काँग्रेसचे किरण काळे आक्रमक; थोरातांनी आणला स्थगन प्रस्ताव!

दोन दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची एक वादग्रस्त व्हीडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यावरून मोठा गदारोळ झाला. याबाबत भाजपने हात झटकले आहेत, तर शिवसेनेने याबाबत कारवाई करण्याची मागणी करीत एक पेन ड्राईव्हच विधान परिषदेत सादर केला होता. त्याबाबत चौकशीचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मात्र त्यावर शिवसेनेचे समाधान झालेले नाही.

यासंदर्भात शहरात गेले दोन दिवस तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून विविध भागात आंदोलन करण्यात आले. काल पंचवटी तसेच सिडको येथे आंदोलन करीत कारवाईची मागणी केली. यावेळी महिला आघाडीच्या नेत्या हर्षा बडगुजर यांनी किरीट सोमय्या यांच्याकडून अनेक महिलांचे शोषण केले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.

Shivsena Agitation in Nashik
Maharashtra Council Live 19 July: खेळ खुर्चीचा विधानपरिषद, महायुतीचे पहिलेच अधिवेशन | NCP | BJP | Shivsena

यावेळी माजी नगरसेविका हर्षा बडगुजर, स्वाती पाटील, अलका गायकवाड, शीतल भामरे, श्रद्धा दुसाने, फैमिदा रंगरेज, वृषाली सोनवणे, सीमा बडदे, श्रृती नाईक, शोभा दिवे, मनिषा लासुरे, एकता खैरे, कीर्ती निरगुडे, शारदा दोंदे, शोभा घोडके, सुजाता टिके, उज्ज्वला जगताप यांसह मोठ्या संख्येने महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com