Kopargaon Politics: विवेक कोल्हेंची तोफ मंत्री विखे, आमदार काळेंवर धडाडली

Vivek Kolhe Jan Aakrosh Morcha : कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
Vivek Kolhe Jan Aakrosh Morcha
Vivek Kolhe Jan Aakrosh MorchaSarkarnama
Published on
Updated on

Shirdi News : भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या दुजाभाव वृत्तीवरून सगळेच काढले आहे. कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील जनतेवर मंत्री विखे हे नेहमीच अन्याय करत आले आहे. या अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी मी कधीही जनतेबरोबर उभा राहील, अशी ग्वाही देत मंत्री विखे यांना विवेक कोल्हे यांनी आव्हान दिले.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींना विविध योजनातंर्गत मिळणाऱ्या शासकीय निधी वितरणात पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्याकडून जाणीवपूर्वक होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आणि जनतेच्या विविध प्रश्नांवर युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आज शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा नेण्यात आला. शिर्डीतील शासकीय विश्रामगृह येथून सुरू झालेल्या मोर्चात शेकडो जण सहभागी झाले होते. पालकमंत्री विखे यांच्या विरोधातील घोषणाबाजी मुळे परिसर दणाणला होता.

Vivek Kolhe Jan Aakrosh Morcha
Vivek Kolhe Statement : आमच्याच पाठपुराव्यामुळे 'एमआयडीसी'ला मंजुरी; विवेक कोल्हेंच्या दाव्याने राजकारण तापले

विवेक कोल्हे यांनी सुरुवातीपासून त्यांच्या भाषणाचा रोख मंत्री विखेंवर ठेवला होता. त्यांची ही तोफ मंत्री विखेंविरोधात जशी धडधड होती, तशा मोर्चातून घोषणाबाजी होत होती. खासदार सुजय विखे, आमदार आशुतोष काळे यांच्यावर देखील विवेक कोल्हे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, मंत्री विखे यांचे राजकारण स्वार्थी आहे. भाजपच्याच कार्यकर्त्यांचे ते खच्चीकरण करत आहेत. पालकमंत्री असले, तरी त्यांच्यात दुजाभाव टिच्चून भरला आहे. सरकारी निधी वाटपात ते अडवा आणि जिरवा असे राजकारण करत आहे. पक्षातील निष्ठावान नेत्यांना हेतूत: त्रास देत आहेत. आमदार आशुतोष काळे यांना हाताशी धरून कोपरगाव मतदारसंघातील कोल्हे गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायतींना सरकारकडून मिळणारा विकास निधी जाणीवपूर्वक रोखून धरला आहे.

गेल्या दीड-दोन वर्षापासून त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून विखे कुटुंब सत्तेत आहे. परंतु या सत्ताकाळात त्यांनी जनतेचे विकासाचे प्रश्न सोडविण्याऐवजी फक्त स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेतली. विविध सरकारी योजनांसह अनेक विकासात्मक कामेही मंत्री विखे यांनी अडवली असून, आम्ही कोपरगाव तालुक्यातून दिलेले ५० पेक्षा अधिक शेळी-मेंढी पालन संस्थेचे प्रस्ताव त्यांनी दीड वर्षांपासून प्रलंबित ठेवल्याचा आरोप विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हे म्हणाले, आम्ही राजकीय स्वार्थासाठी आमदार आशुतोष काळे यांच्यासारखे गुडघ्यावर बसून तुमचे पाय चेपणार नाही, तर स्वाभिमानाने जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहू. कोपरगाव मतदारसंघातील जनता आमदार काळेंच्या निष्क्रियतेला पुरती कंटाळली असून, अशा निष्क्रिय आमदारांची गॅरंटी तुम्ही घेता. तुमच्या जिरवाजिरवी, दडपशाही व हुकूमशाहीच्या राजकारणाला जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही कोल्हे यांनी विखे पिता-पुत्रांना दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

Vivek Kolhe Jan Aakrosh Morcha
Rupali Chakankar : 'बेडूक फुगला की त्याला बैल झाल्यासारखं वाटतं...',चाकणकरांनी खासदार कोल्हेंना डिवचलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com