Rupali Chakankar : 'बेडूक फुगला की त्याला बैल झाल्यासारखं वाटतं...',चाकणकरांनी खासदार कोल्हेंना डिवचलं

Kolhapur Political News : 'विकासाच्या जोरावर सुनेत्रा पवार सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील...'
Rupali Chakankar - Amol Kolhe
Rupali Chakankar - Amol Kolhe Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना माझ्याविरोधात शिरूर मतदारसंघामध्ये उमेदवार मिळत नाही, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारवर केली होती. त्याला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. रूपाली चाकणकर यांनी अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीवरून जोरदार हल्ला चढवला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून बोलताना रूपाली चाकणकर यांनी, प्रत्येक घरामध्ये त्या त्या व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे. निवडणूक लढवावी न लढवावी ते त्यांच्या कर्तृत्वानुसार ठरते. विकासाच्या जोरावर सुनेत्रा पवार सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील. ज्या ज्या मतदारसंघात आमचे उमेदवार आहेत ते सर्व निवडून येतील, असा विश्वास चाकणकर यांनी व्यक्त केला.

Rupali Chakankar - Amol Kolhe
मोठी बातमी ! राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका; कोणी केली दाखल ?

नणंद-भावजय अशी लढाई ही वाटत नाही. कारण पंधरा वर्षे आम्हीही सुप्रिया सुळे यांच्यासाठी काम केलं आहे. एकाच जागेवर सातत्याने तुम्हालाच संधी का मिळावी? असा सवाल करत सुनेत्रा वहिनींनी मतदारसंघात अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं आहे. पंधरा वर्षांनी तेथील जनता नव्या नेतृत्वाला संधी देऊ शकते, असा दावाही रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केला.

राष्ट्रवादीच्या जागावाटपावरून बोलताना चाकणकर यांनी अजितदादांना ज्या ज्या जागा मिळतील तेथे सर्व ठिकाणी उमेदवार लवकरच जाहीर होतील. दादांची सर्व यंत्रणा तयारीला लागलेली आहे. विरोधकांनी कोणताही उमेदवार दिला, तरीही प्रत्येक ठिकाणी अजितदादा उभे आहेत असे समजून प्रचंड मतांनी आमचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) केलेल्या टीकेवर चाकणकर यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. बेडकाने छाती फुगवली की, त्याला बैल झाल्यासारखं वाटतं असा त्यांचा प्रकार आहे.

उमेदवार मिळत नाही असे हास्यास्पद विधान त्यांनी करू नये. मतदारसंघात कधीही न फिरलेले अमोल कोल्हे त्यांच्या नाटकाच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःच्या घरासमोरील रस्तादेखील त्यांना पाच वर्षांत करता आला नाही. इतका आत्मविश्वास त्यांना कुठून येतो हाच मला प्रश्न पडतो, असा टोला चाकणकर यांनी लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Rupali Chakankar - Amol Kolhe
मोठी बातमी ! राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका; कोणी केली दाखल ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com