AIMIM: भाजपच्या खासदारांनी धुळे शहराचा विकास रोखला?

धुळे शहरातील समस्यांबाबत `एमआयएम`तर्फे भाजपविरोधात आंदोलन करण्यात आले.
AIMIM agitation at Dhule
AIMIM agitation at DhuleSarkarnama
Published on
Updated on

धुळे : तीन वर्षांपासून आमदार फारुक शाह (MLA Faruk Shah) शहर विकासासाठी (Dhule city) प्रयत्नशील आहेत. त्यासाठी ते मुबलक निधी मिळवत आहेत. यात शहरातील रस्त्यांसाठी त्यांनी शासनाकडून (Government funds) ३० कोटींचा निधी मंजूर करून आणला. परंतु, भाजपच्या (BJP) खासदारांसह समर्थकांनी या निधीतील कामाला स्थगिती आणली आहे. अशा भूमिकेविरोधात एमआयएमच्या (AIMIM) महिला आघाडीने धिक्कार आंदोलन केले. (AIMIM agitation against BJP for City civic issues)

AIMIM agitation at Dhule
काँग्रेसला खिंडार; नंदुरबार जि. प. वर भाजपची सत्ता

महापालिकेसह विविध पदांवर भाजपचे नेते सत्तेत आहेत. मात्र या सत्तेचा उपयोग ते राजकारणासाठी नागिरकांची अडचण कशी करता येईल यासाठी करतात. आमदार फारूक शाह यांनी विकासाच्या प्रश्नावर सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. निधी आणला. मात्र या निधीतून विकासकामे न करता त्यावर स्थगिती मिळवण्याचे काम भाजप व त्यांचे खासदार करतात, असा आरोप यावेळी दिलेल्या निवेदनात करण्यात आला.

AIMIM agitation at Dhule
हायस्पीड रेल्वे असताना तिसरा महामार्ग हवा कशाला?

आंदोलक म्हणाले, अनेक आमदारांनी शहरवासीयांना विकासाचे गाजर दाखविले. परंतु, विकास केला नाही. मात्र, रस्ते, गटार, पाणी, रेशन मिळवून देणे, तसेच दिव्यांगांसह विधवा, परीतक्त्या व गरिबांना न्याय देण्याचे काम आमदार शाह करीत आहेत. शहराचा बट्याबोळ, देवपूरला खड्डेपूर करणाऱ्या मनपा प्रशासन व भाजपविरुद्ध अनेकांनी आमदारांना निवेदन दिले. या पार्श्वभूमीवर शहरातील संपूर्ण रस्ते होण्यासाठी आमदार शाह यांनी शासनाकडून ३० कोटींचा निधी मंजूर करून आणला. परंतु, खासदार डॉ. सुभाष भामरे व समर्थकांनी यातील कामाला स्थगिती आणली आहे. त्यामुळे शहराचा विकास रखडला.

एमआयएमच्या महिला शाखेच्या अध्यक्षा डॉ. दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, शकिला अन्सारी, शाहीन बी. इकबाल, फरजाना शाह, वालेमून रहेमान, अकीला बानू, रिझवान बानू, जुबेदा बानो शाह, निलोफर शाह, शबाना गुलाम मस्ताफा पिंजारी, शाहीन वकील अहमद, हमिदा पठाण, आसेफा सय्यद, मैमूना शेखअकिला पिंजारी, रेहाना पिंजारी, फैमिजा अन्सारी, जिल्हाध्यक्ष नासीर पठाण, शहराध्यक्ष मुक्तार अन्सारी आदी आंदोलकांनी भाजप विरोधात घोषणा देत तीव्र निषेध केला.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com