काँग्रेसला खिंडार; नंदुरबार जि. प. वर भाजपची सत्ता

काँग्रेसच्या सदस्यांच्या मदतीने भाजपच्या अध्यक्षपदी डॉ. सुप्रिया गावित, उपाध्यक्षपदी सुहास नाईक विजयी.
Dr. Supriya Gavit & Suhas Naik
Dr. Supriya Gavit & Suhas NaikSarkarnama

नंदुरबार : जिल्हा परिषदेवरील सत्तांतराबाबत सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना सोमवारी पूर्णविराम मिळाला. भारतीय जनता पक्षाने (BJP) काँग्रेसला (Congress) खिंडार पाडत काही सदस्यांच्या मदतीने जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित, (Dr. Supriya Gavit) तर उपाध्यक्षपदी सुहास नाईक (Suhas Naik) बहुमताने विजयी झाले. (Congress members refuse party order & voted BJP)

Dr. Supriya Gavit & Suhas Naik
आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका!

जिल्हा परिषदेवरील सत्तांतर काँग्रेस व शिंदे गटाच्या शिवसेनेला बहुमत असताना, ही सत्ता हातून निसटल्याबाबत मंथन करायला लावणारी आहे.

Dr. Supriya Gavit & Suhas Naik
माकपच्या जे. पी. गावितांच्या सुरगाणा गडाला हादरे

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अडीच वर्षांनंतर पुढील अडीच वर्षांसाठी सोमवारी निवडणूक झाली. त्यात जिल्हा परिषदेवर सत्तांतऱ्याचे वारे सुरू असल्याची जोरदार चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. भाजपने विशेषत: आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित व खासदार डॉ. हीना गावित यांनी भाजपची सत्ता मिळविण्यासाठी कंबर कसली होती. एकीकडे राज्य शासनात भाजप व शिंदे गटाच्या शिवसेनेची युती असताना, नंदुरबार जिल्हा परिषदेत असेच समीकरण घडेल, असे वाटत होते. मात्र, शिंदे गटाच्या शिवसेनेने मागील महाविकास आघाडीतील पक्षांसोबत केलेल्या लेखी करारानुसार स्थानिक स्तरावर महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेच्या निर्णय घेतला होता. त्यामुळे भाजपला पुन्हा बाजूला राहावे लागणार होते.

अर्थात, भाजपकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. केवळ २० सदस्य असताना भाजपने सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले. सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपने सत्ताधारी काँग्रेस गटाचे पाच सदस्य व उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे दोन आणि राष्ट्रवादीचे चार, अशा ११ सदस्यांची जुळवाजुळवा करून ३१ सदस्यांचा आकडा गाठला. त्यामुळे काँग्रेस व उद्धव ठाकरे शिवसेना गटातील सदस्य संख्या २५ वर आली.

जास्त सदस्यांनी भाजपच्या बाजूने कल देऊन अध्यक्षपदी डॉ. सुप्रिया गावित व उपाध्यक्षपदी सुहास नाईक यांना विजयी केले. या दोघांनाही प्रत्येकी ३१ मते पडली, तर काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड. सीमा वळवी व उपाध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. राम रघुवंशी यांना प्रत्येकी २५ मते पडली. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेवर काँग्रेसकडे बहुमत असतानाही भाजपने आपल्या कुशल कौशल्याचा वापर करीत काँग्रेसलाच खिंडार पाडून सत्ता स्थापन केली. उपाध्यक्ष म्हणून विजयी झालेले सुहास नाईक काँग्रेसचे सदस्य आहेत. त्यांनी भाजपला कल देत सत्तांतर घडवून आणले.

भाजपचे संख्याबळ असे

भाजप २०, काँग्रेस ५, राष्ट्रवादी काँग्रेस ४, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना २, असे एकूण ३१

महाविकास आघाडी संख्याबळ

काँग्रेस १९, शिंदे शिवसेना ६, असे एकूण २५

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com