BJP Loksabha Election : 'लोकसभा निवडणूक जिंकणे, हे विरोधकांचे स्वप्नरंजन!'

BJP Lok sabha election 2024, state General Secretary Vijay Choudhary taken a review-धुळे लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने सुरू केली ग्राउंड लेव्हलपासून तयारी.
BJP Leader Vijay Choudhary
BJP Leader Vijay ChoudharySarkarnama
Published on
Updated on

BJP Dhule Politics : धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी एवढी विकासकामे केली आहेत, की विरोधकांनी निवडणूक जिंकण्याचे स्वप्नदेखील पाहू नये. ते विरोधकांचे स्वप्नरंजन ठरेल. (Upcoming Loksabha election prepration of BJP is on at Grassroot lavle)

भाजपचे (BJP) प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी (Vijay Choudhary) यांच्या उपस्थितीत धुळे (Dhule) लोकसभा मतदारसंघात बूथ सशक्तीकरणाचा आढावा घेण्यात आला. या वेळी त्यांनी काँग्रेससह (Congress) विरोधी पक्षांचा समाचार घेतला.

BJP Leader Vijay Choudhary
Maratha Reservation News : येवल्यातील कार्यकर्ते मशाल घेऊन निघाले रायगडावर!

भारतीय जनता पक्ष अतिशय परिश्रमपूर्वक पक्षाची संघटनात्मक यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात काम करीत आहे. यासंदर्भात पक्षाचे प्रदेश सरचिटणीस महिनाभरात दुसऱ्यांदा दौरा करीत आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रमुख पदाधिकारी, सुपर वॉरियर्सची धुळ्यात कार्यशाळा झाली. या वेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या टिप्स पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या.

यासंदर्भात त्यांनी ‘सरकारनामा’ला माहिती दिली. ते म्हणाले, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहर, धुळे ग्रामीण व शिंदखेडा विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व भाजप सुपर वॉरियर्सची कार्यशाळा गेल्या आठवड्यात घेण्यात आली. नाशिक, नगर जिल्ह्यांचा देखील दौरा झाला आहे. यावेळी आम्ही प्रत्येकाशी व्यक्तिगत संवाद साधला.

भाजपने जी मेहनत घेतली आहे, जनतेसाठी विकासाची कामे केली आहेत, त्याची तुलना अन्य कोणत्याही राजकीय पक्षाशी होऊ शकत नाहीत. त्यामुळे विरोधकांकडे काहीही मुद्दे नाहीत. त्यांनी निवडणूक जिकंण्याचे स्वप्नदेखील पाहू नये, असा दावा त्यांनी केला.

या दौऱ्यात खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, धुळे लोकसभा निवडणूक प्रमुख राजवर्धन कदमबांडे आदींसह विविध पदाधिकारी सहभागी झाले.

BJP Leader Vijay Choudhary
Maratha Reservation News : येवल्यातील कार्यकर्ते मशाल घेऊन निघाले रायगडावर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आत्मनिर्भर होत आहे. संपूर्ण विश्वात देशाचे नाव उंचावले गेले आहे. आगामी काळात मोदींच्या संकल्पनेतील विश्र्वगुरू भारत घडविणे हे भाजपचे ध्येय आहे. त्यासाठी केंद्रातील सरकार व भाजपला सर्व जनतेतून समर्थन मिळत आहे. कार्यकर्ते त्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करीत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेते अतिशय परिश्रम घेत आहेत.

BJP Leader Vijay Choudhary
Dhananjay Munde: 'बीडमधील हिंसाचार हे मोठे षडयंत्र, एसआयटी चौकशीसाठी...'; मंत्री धनंजय मुंडेंचे गंभीर आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com