Dhananjay Munde: 'बीडमधील हिंसाचार हे मोठे षडयंत्र, एसआयटी चौकशीसाठी...'; मंत्री धनंजय मुंडेंचे गंभीर आरोप

Maratha Reservation: बीडमधील जाळपोळीच्या घटनेनंतर पालकमंत्री मुंडे यांनी नुकसानीची पाहणी केली.
Dhananjay Munde
Dhananjay Munde Sarkarnama
Published on
Updated on

Beed News: बीडमधील जाळपोळ, दगडफेक या हिंसाचाराच्या घटना हे मोठे षडयंत्र आहे. याचा तपास एसआयटीमार्फत व्हावा, अशी मागणी आपण राज्य सरकारकडे करणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी सांगितले. तसेच आरक्षणाची अनेक आंदोलनं देशाने बघितली. मात्र, अशा पद्धतीने एखाद्याला नेस्तनाभूत करण्याचं काम झालं नव्हतं, असेही मुंडे म्हणाले.

गेल्या सोमवारी शहरातील राष्ट्रवादी भवन, क्षीरसागर यांचा बंगला, कार्यालय, धैर्यशील सोळंके यांचे घर, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचे कार्यालय तसेच काही हॉटेल्स व एका ज्वेलर्ससह भाजप, शिवसेना कार्यालयांवर दगडफेक करून मोठे नुकसान करण्यात आले.

या घटनेनंतर रविवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांसह या नुकसानीची पाहणी केली. यानंतर त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या शिवछत्र निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhananjay Munde
Dhananjay Munde News : मराठा आंदोलनात बीड एवढं जळालं ; पण पालकमंत्री धनंजय मुंडेंना पाहायला वेळ नाही ?

"जिल्हा पेटविण्याचा समाज कंटकांनी प्रयत्न केला. यापूर्वी कधीच नाही, असा प्रकार घडला. माजलगावची घटना दुर्दैवी. यापूर्वी राज्यात देशात व राज्यात आरक्षणाची आंदोलने घडली. मात्र, अशा आंदोलनात कोणाचे घर नेस्तनाबूत करण्याचे प्रकार कधीच घडले नाहीत. व्यवसायाची ठिकाणे जाळण्यात आली. घडलेल्या प्रकाराचा आपण निषेध करतो.

ज्या पद्धतीने एका ऑडिओ क्लिपचा अर्थाचा अनर्थ करून समाजात वितुष्ट तयार केले. माजलगावला आमदार सोळंकेंच्या घरावर हल्ला आणि त्यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केले गेले. सोळंकेदेखील मराठा समाजाचे आहेत. पोलिस माजलगावला गेल्यानंतर बीडमध्येही विशिष्ट लोकांच्या घरांवर व व्यवसायांवर हल्ले केले गेले," असे मुंडेंनी सांगितले.

"बीडपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील हॉटेल जाळले. एवढा जमाव १५ किलोमीटर लोकं कसे काय जाऊ शकतात", असा सवालही मुंडे यांनी केला. "हा सर्व प्रकार ठरवून झालेला असल्याचे आपणाला पाहणीनंतर लक्षात आले आहे. एकाच वेळी प्रकार घडल्याने पोलिस हतबल होते. जबाबदार असलेल्यांना शिक्षा झालीच पाहिजे. प्रशासन, सार्वजनिक ठिकाणांचे नुकसान झाले असते तर समजण्यासारखे होते. मात्र, लोकप्रतिनिधी व नेत्यांची घरे जाळले हा ठरवून झालेला प्रकार आहे," असा आरोपही त्यांनी केला.

आपण याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची मंगळवारी भेट घेऊन हा तपास एसआयटीमार्फत करावा, अशी मागणी करणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. ज्यांच्या घरावर हल्ले करायचे होते, त्यांना यामागील सूत्रधाराने नंबरदेखील दिले असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

पार, हातोड्यांनी तोडफोड व पेट्रोल बाँब टाकल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. "सराटी अंतरवालीतील लाठी हल्ल्याबाबत सरकारने दिलगिरी व्यक्त केली. पोलिसांवरही कारवाई करण्यात आली. या घटनेवेळी पोलिस माजलगावला गेले होते. हा प्री प्लॅनच होता, दंगलीतदेखील असे घडलेले नाही. असे कृत्य करणाऱ्यांना शासन व पोलिस शिक्षा करतीलच. यामध्ये इंटेलिजन्सचे अपयशच असल्याचेही त्यांनी नमूद केले. मराठा, ओबीसी अशा सर्वच नेत्यांना टार्गेट करण्यात आले आहे. यामागे षडयंत्रच असून, त्याची व्याप्ती मोठी आहे."

Dhananjay Munde
Dhananjay Munde News : अखेर पालकमंत्री मुंडेंकडून जाळपोळीच्या नुकसानीची पाहणी; सरकारनामा बातमीचा परिणाम !

"दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. ही ताेडफाेड आठ साडेआठ तास सुरू असताना पोलिसांकडून दुर्लक्ष झाले असेल, तर त्याचा तपासही एसआयटीने करावा. सोशल मीडियावर माजलगाव जळाले आता परळीकडे चला अशाही पोस्ट पडल्या", असेही त्यांनी सांगितले. या वेळी अमरसिंह पंडित, राजेश्वर चव्हाण, डॉ. योगेश क्षीरसागर, सचिन मुळुक आदी उपस्थित होते.

'त्या' जखमीला नेमके कुठे उपचार ?

"हॉटेलचे छत फोडण्यासाठी एकजण वरती चढला होता. या वेळी समोरून आग लागल्यानंतर त्याने वरून उडी मारली. त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. त्याच्यासाठी वेळेत ॲम्ब्युलन्स कशी पोचली, त्याला कुठे नेण्यात आले, त्याच्यावर उपचार कुठे केले, कोणाच्या घरात उपचार झाले का, आता तो नेमका कुठेय याचाही तपास होणे गरजेचे आहे," असे धनंजय मुंडे म्हणाले.

Edited By - Ganesh Thombare

Dhananjay Munde
Prakash Solanke Meet Jarange Patil : आमदार सोळंकेंवरचा मराठा समाजाचा राग मावळणार ? जरांगे पाटलांची भेट घेत वादावर पडदा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com