Loksabha Election 2024 : भाजप म्हणते, "नाशिक मतदारसंघ आमचाच"

Nashik BJP : भारतीय जनता पक्षाकडून नाशिक मतदारसंघासाठी वरिष्ठ नेत्यांकडे लॉबिंग सध्या सुरु आहे. भाजप आणि सहकारी पक्षांमध्ये नाशिकच्या जागेवरून मोठ्या वादाची चिन्हे आहेत.
Loksabha 2024
Loksabha 2024Sarkarnama
Published on
Updated on

BJP Nashik politics: नाशिक मतदारसंघासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्तेही अत्यंत आग्रही आहेत. त्यामुळे भाजप आणि सहकारी पक्षांमध्ये नाशिकच्या जागेवरून मोठ्या वादाची चिन्हे आहेत.

भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील पक्षाचे विद्यमान खासदार असलेल्या 23 मतदारसंघात आपले निरीक्षक नियुक्त केले आहेत. मात्र यामध्ये नाशिकचा समावेश नाही. त्यामुळे आज पक्षाच्या पदाधिकारी नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांची संपर्क केला. नाशिक मतदारसंघ कोणत्याही स्थितीत भाजपकडे ठेवावा, यासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे नाशिक (Nashik) मतदारसंघासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार लॉबिंग सुरू करण्यात आले आहे.Loksabha 2024

भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (loksabha Election) काही धोरणात्मक आडाखे निश्चित केले आहेत. यामध्ये सबंध देशातील धार्मिक स्थळे असलेल्या मतदार संघाचे यादी करण्यात आली आहे. त्यात नाशिक हे श्रीराम सर्किटमध्ये येते. त्यामुळे हमखास यश मिळेल, अशा मतदारसंघात या शहराचा समावेश आहे. याची माहिती मिळाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील विविध स्तरावर चाचणी केली आहे. त्यासाठी काही खाजगी संस्थांकडून सर्वे देखील करण्यात आले. या पार्श्वभूमीवर नाशिकची जागा पक्षाला मिळावी यासाठी पदाधिकारी हिरीरीने कामाला लागले आहेत.

Loksabha 2024
Maratha Reservation News : भाजपचे बाहुले बनलेले 'ते' चार नेते कोण?

यंदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडे (BJP) इच्छुकांची मोठी रांग आहे. यातील काही इच्छुकांनी तर उमेदवारी मिळालीच असे गृहीत धरून जोरदार प्रचार आणि मतदारसंघभर फ्लेक्स लावण्याचा धडका लावला आहे. यामध्ये पक्षाचे महापालिकेतील माजी सभागृह नेते दिनकर पाटील आघाडीवर आहेत. नाशिक (Nashik) मतदारसंघाचे संपर्कप्रमुख केदा आहेर यांनी देखील तयारी सुरू केली आहे. एक गंभीर उमेदवार म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे हे देखील इच्छुक आहेत. आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, गिरीश पालवे यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

या संदर्भात नाशिक मतदारसंघाचे प्रदेश समन्वयक पालवे यांनी कार्यकर्ते नाशिक मतदारसंघासाठी अत्यंत आग्रही असल्याचे सांगितले. पदाधिकाऱ्यांनी याबाबत आपला अहवाल केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांना दिला आहे. मतदारसंघाचे जागावाटप कसे होते याचे धोरण वरिष्ठ नेते ठरविणार आहे. हा मतदारसंघ मिळावा, यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यात आम्ही निश्चित यशस्वी होऊ, असा विश्वास वाटतो असे 'सरकारनामा'ला सांगितले.

Edited By : Rashmi Mane

Loksabha 2024
Adivasi Andolan : चार आमदार आणि एक केंद्रीय राज्यमंत्री तरीही राज्यातील आदिवासी पोरकेच!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com