Sharad Pawar : भाजपचा डाव शरद पवार उलटवणार; माजी मंत्र्यांची घरवापसी होणार?

Madhukarrao Pichad will come back to Sharad Pawar : भाजपमध्ये गेलेले मधुकरराव पिचड आणि त्यांचा चिरंजीव माजी आमदार वैभव पिचड पुन्हा शरद पवार यांच्याकडे येणार असल्याचे संकेत आहेत. शरद पवार नगर आणि नाशिक दौऱ्यावर असताना ही राजकीय घडामोड होण्याचे संकेत आहेत.
Sharad Pawar 1
Sharad Pawar 1Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांचा राजकीय दणका महायुतीला चांगलाच बसला. नाशिक आणि नगर दौऱ्यावर असलेले शरद पवार पुन्हा भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

शरद पवार यांची साथ सोडून भाजपवासी झालेले माजी मंत्री मधुकरराव पिचड पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात येणार असल्याची कुजबूज आहे. तसे झाल्यास भाजपला हा शरद पवार यांचा नगर जिल्ह्यात मोठा धक्का ठरू शकतो.

लोकसभा निवडणुकीला महायुतीला शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने चांगलाच दणका दिला. या दणक्यातून सावरत नाही, तोच शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरू केली. 'राज्यात सत्ता बदल करायचाच', अशा तयारीत शरद पवार असल्याने त्याचा अनेकांनी धसका घेतलाय. यातून शरद पवार यांचे राज्यभर दौरे सुरू असून, त्यांच्या पक्षात इनकमिंग वाढले आहे.

Sharad Pawar 1
MIM In Ahmednagar : असदुद्दीन ओवैसींचा आदेशच घेऊन जिल्हाध्यक्ष परतले; 'एमआयएम' आता धडकी भरवणार

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दिग्गज नेते मधुकरराव पिचड हे शरद पवार यांचे कट्टर समर्थकांपैकी एक! परंतु 2014 मध्ये देशात मोदी लाट आली. ती 2019 मध्ये कायम राहिली. याच वेळी मधुकरराव पिचड आणि त्यांचे चिरंजीव माजी आमदार वैभव पिचड यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि भाजपमध्ये (BJP) सहभागी झाले. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची अकोले येथे ताकद लावली आणि किरण लहामटे यांना आमदार केले. वैभव पिचड यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर किरण लहामटे यांनी अजितदादांना साथ दिली. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी अकोले मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे.

Sharad Pawar 1
Chhagan Bhujbal: 'मराठा-ओबीसी वादावर शरद पवार तोडगा काढतील', छगन भुजबळांना विश्वास

भाजपमध्ये गेलेले मधुकरराव पिचड हे शरद पवार यांच्या पुन्हा संपर्कात असल्याची कुजबूज होऊ लागली. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी मोहिते पाटील कुटुंबाला पुन्हा आपलंसं केले. माढा लोकसभा जागा जिंकली. त्याचप्रमाणे शरद पवार पु्न्हा आपल्याला आपलसं करतील, अशी अपेक्षा मधुकरराव पिचड बाळगून आहेत. शरद पवार यांच्याशी पिचड यांचा संपर्क वाढल्याचे देखील समोर येत आहे.

शरद पवार देखील पिचड यांना पुन्हा घेऊन आदिवासी समाजाला आपल्या पक्षाबरोबर घेण्याच्या तयारीत आहेत. पिचड माजी मंत्री असून, ते आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांच्याबरोबर पिचड आल्यास, पवार यांच्या पक्षाची राज्यातील आदिवासी समाजात ताकद वाढू शकते. नगर जिल्ह्यातील ही मोठी राजकीय घडामोड लवकर होण्याची चिन्हं असून, त्याचे राज्यात पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदार किरण लहामटे हे उमेदवार असल्याची दाट शक्यता आहे. शरद पवार यांना यावेळी अकोले विधानसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थिती घेण्याची तयारी सुरू केली असून, त्यानुसार तिथे मोर्चे बांधणी करत आहेत. यातूनच शरद पवार यांच्याबरोबर पिचड येऊ शकतात, अशी राजकीय समीकरणं जुळत आहेत.

काँग्रेस दावा सांगण्याच्या तयारीत

मध्यतंरी अकोले मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील चांगली राजकीय पकड निर्माण केली. निळवंडे धरण प्रकल्पाच्या माध्यमातून आमदार थोरात यांनी काँग्रेस पक्षाची चांगली मोट बांधलीय. काँग्रेस देखील विधानसभेला या मतदारसंघावर दावा सांगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तशी काँग्रेसने देखील तयारी केली. महाविकास आघाडीत येथे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com